Join us

‘उडता पंजाब’वर प्रेक्षक फिदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2016 3:12 AM

अभिषेक चौबे दिग्दर्शित उडता पंजाब या चित्रपटाची प्रदर्शित होण्यापूर्वीच सेन्सॉर बोडार्मुळे चांगलीच हवा निर्माण झाली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १० कोटींचा गल्ला जमवला

अभिषेक चौबे दिग्दर्शित उडता पंजाब या चित्रपटाची प्रदर्शित होण्यापूर्वीच सेन्सॉर बोडार्मुळे चांगलीच हवा निर्माण झाली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १० कोटींचा गल्ला जमवला. शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शन्समध्ये किंचित वाढ झाली आणि रविवार अखेरीस चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर 33 कोटींचा गल्ला जमवला. शाहिद कपूरच्या आतापर्यंतच्या सर्व सोलो हिरो चित्रपटामधील हा वीकएंड कलेक्शनचा उच्चांक आहे. चित्रपट पंजाब आणि दिल्ली या प्रातांत देशातील इतर प्रांतांपेक्षा चांगला व्यवसाय करत आहे. चित्रपटाला सिंगल स्क्रीनपेक्षा मल्टिप्लेक्समध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिंगल स्क्रिनमध्ये मात्र चित्रपटाचा व्यवसाय साधारणपणे वाईट आहे. सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शन्समध्ये बरीच घट झालेली आहे.‘धनक’ला प्रेक्षकांनी नाकारले नागेश कुकुनूर दिग्दर्शित धनक या चित्रपटाला समीक्षकांची खूप वाहवा मिळाली. परंतु बॉक्स आॅफिसवर मात्र चित्रपट साफ झाला आहे.हाऊसफुल्ल -३, १०० कोटींच्या पुढेसाजिद -फरहाद दिग्दर्शित हाउसफूल्ल-३ या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलेच झोडपले, परंतु प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाला चांगलाच हात दिला. चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला. ‘एअर लिफ्ट’ नंतर १०० कोटींचा गल्ला पार करणारा अक्षय कुमारचा या वर्षातला हा दुसरा चित्रपट ठरला आहे.

‘सैराट’ची घौडदौड सुरू, इतर मराठी चित्रपट भुईसपाट

दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओच्या सैराट या चित्रपटाची तुफानी घौडदौड सुरूच आहे. चित्रपटाने आठव्या आठवडयाच्या सुरुवातीपर्यंत ९० कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाची आता १०० कोटींकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिथे शाहरुख खान आणि सलमान खान यांसारख्या सुपरस्टार्सचे सुपर हिट चित्रपट चौथ्या आठवडयात धापा टाकू लागतात, तेथे सैराटची आठव्या आठवडयातील घौडदौड प्रचंड कौतुकास्पद आहे. सैराटच्या झंझावातात इतर मराठी चित्रपटांची पुरती वाताहत झाली आहे. लालबागची रानी, युथ, बर्नी, बरड, चीटर, पिंडदान, या सर्व चित्रपटांनी सपाटून मार खाल्ला आहे. या आठवडयात प्रदर्शित होणारे एक अलबेला, गणवेश हे याला अपवाद ठरतात का हे पाहण्याजोगे आहे. -एन. पी. यादव (ट्रेड एक्सपर्ट)