Join us

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मयुरी देशमुखने पतीसोबतच्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 5:35 PM

आज मयुरी आणि आशुतोषच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मयुरीने पतीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने काही दिवसांपूर्वी राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. आशुतोष भाकरेने नैराश्यातून आपले जीवन संपवल्याची माहिती त्यानंतर पुढे आली होती. मयुरी आणि त्याच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न मयुरी करते आहे. आज मयुरी आणि आशुतोषच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मयुरीने पतीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

मागील वर्षातील लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत मयुरीने लिहिले की, गेल्या वर्षी, "याच दिवशी... आमचा लग्नाचा वाढदिवस... नेहमीच्या रोमांटिक ऐवजी आपण अॅन्डव्हॅचरस डेटवर गेलो होतो, याचा मला आनंद आहे. त्यामुळे आपण खूप हसलो... आमच्या हसण्याच्या अनेक आठवणी आहेत. प्रेम." 

यापूर्वी मयुरीने आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्यानंतर मोजक्यात पोस्ट करणाऱ्या मयुरीने आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.

 आता 'इमली' हा हिंदी मालिकेतून मुयरी रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत गश्मीर महाजनी आणि सुम्बुल तौकीर प्रमुख भूमिकेत आहेत.

टॅग्स :मयुरी देशमुख