Join us

KK Death : कोलकात्याने KKची हत्या केली..! ओम पुरींची एक्स-वाईफ नंदिता पुरी संतापली, केली सीबीआय चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 10:29 AM

Om Puri ex-wife Nandita Puri Demands CBI inquiry For KK: लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान केकेच्या अचानक झालेल्या मृत्यूने सगळ्यांनाच जबर धक्का बसला आहे. कॉन्सर्टचे व्हिडीओ पाहून चाहते संतप्त आहेत. ओम पुरी यांची एक्स-वाईफ नंदिता पुरी हिनेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

KK Death : तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवूडचा लोकप्रिय गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (KK Krishnakumar Kunnath) आज आपल्यात नाही. 31 मे रोजी त्याचं निधन झालं. केके या जगात नाही, यावर अद्यापही चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान केकेच्या अचानक झालेल्या मृत्यूने सगळ्यांनाच जबर धक्का बसला आहे. कॉन्सर्टचे व्हिडीओ पाहून चाहते संतप्त आहेत. 

लाईव्ह कॉन्सर्टदरम्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून केकेच्या मृत्यूवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ज्या ऑडिटोरियममध्ये कॉन्सर्ट सुरू होतो, तिथे क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षक होते, एसी काम करत नव्हता. केके  घामाघूम झालेला दिसत होता. ही परिस्थितीच केकेच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, असा दावा केला जात आहे. लोक संतप्त आहे. दिवंगत अभिनेते ओम पुरी  (Om Puri) यांची एक्स-वाईफ नंदिता पुरी (Nandita Puri)  हिनेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

नंदिता पुरीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिलीये. तिने लिहिले, ‘पश्चिम बंगालला लाज वाटायला हवी. कोलकाता प्रशासनाने केकेची हत्या केली आणि आता पश्चिम बंगाल सरकार यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतेय. कॉन्सर्टमध्ये कोणतीही दक्षता घेतली गेली नव्हती. अडीच हजार क्षमता असलेल्या नजरूल मंचावर 7 हजार लोक होते. एसी काम करत नव्हता. केके घामाघुम झाला होता. 4 वेळा तक्रार करूनही त्याचं कोणीही ऐकलं नाही. ना औषधं होती, ना फर्स्ट एडची सोय होती. याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. तोपर्यंत बॉलिवूडने प. बंगालमध्ये परफॉर्म न करता बायकॉट केलं पाहिजे,’ अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

कोलकात्यात केकेचा दोन दिवसांचा कार्यक्रम होता. 30 मे रोजी परफॉर्म केल्यानंतर 31 मेच्या संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत केकेने नजरूल मंचावर गाणी सादर केली. याचदरम्यान त्याची प्रकृती बिघडली. त्याला ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रूग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं.

टॅग्स :केके कृष्णकुमार कुन्नथओम पुरीबॉलिवूडपश्चिम बंगाल