Join us

मी प्रेग्नंट असताना दुसरीसोबत अफेअर; ओम पुरींच्या पहिल्या पत्नीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मिसकॅरेज झाल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:46 IST

गरोदर असताना ओम पुरी यांचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू होतं, असा धक्कादायक खुलासा त्यांच्या पहिल्या पत्नीने केला आहे.

दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पहिली पत्नी सीमा कपूर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दुसरी मुलगी ओम पुरी यांच्या आयुष्यात आल्याने आमचं लग्न तुटल्याचं सीमा कपूर यांनी म्हटलं आहे. त्याबरोबरच गरोदर असताना ओम पुरी यांचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू होतं, असा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला आहे. 

सीमा कपूर यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "आमच्यात सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण, सिटी ऑफ जॉय या हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांची नंदितासोबत ओळख झाली. या सिनेमामुळे माझं आयुष्य बरबाद झालं. माझी मैत्रीण आणि विधू विनोद चोप्रा यांची पहिली पत्नी रेणु सलूजा हिला सगळं काही माहीत होतं. मात्र, तिला वाटलं की हे फक्त सिनेमापुरतं सुरू राहील. त्यानंतर सगळं नीट होईल, असं वाटलं होतं. मला त्यांच्या या संबंधांबाबत मला फार उशीरा समजलं. रेणुने मला फोन करून सांगितलं की तो कुणाला तरी डेट करत आहे. तेव्हा मी दिल्लीला होते". 

"मी मुंबईला आले पण मला सगळं व्यवस्थित वाटलं. जेव्हा ओम पुरी शूटिंगसाठी शहराबाहेर गेले तेव्हा मी त्यांच्या सामानात शोधाशोध केली. तेव्हा मला लव्ह लेटर मिळाले. मला खूप मोठा धक्का बसला. त्यांचं अफेअर असलं तरी मला त्यांच्यापासून कधीच घटस्फोट घ्यायचा नव्हता. मला सगळं काही व्यवस्थित करायचं होतं. कारण, मी गरोदर होते. त्यांना माहीत होतं की मी गरोदर आहे. पण, नंदिता इनसिक्योर होती. ती माझ्यासमोरच त्यांना फोन करायची", असंही त्यांनी सांगितलं. 

पुढे त्या म्हणाल्या, "मला कोणाबरोबरही वाद घालायला आवडत नाही. पण, ते मुद्दाम माझ्यासोबत भांडण काढायचे. गोष्टी खूप बिघडल्या होत्या. ओम पुरी खूप जास्त ड्रिंक करायला लागले होते. एक दिवस मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. मी तीन महिन्यांची गरोदर होते". नंतर त्यांचं मिस कॅरेज झालं तेव्हा ओम पुरींनी सेक्रेटरीला सांगून त्यांना २५ हजार रुपये दिले होते. मात्र सीमा यांनी पैसे घेण्यास नकार दिला. 

टॅग्स :ओम पुरीसेलिब्रिटी