अभिनेता आयुषमान खुराणा आपला आगामी चित्रपट 'ड्रीमगर्ल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याने स्टार प्लस वाहिनीवरील 'नच बलिये'च्या ९व्या सीझनमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत त्याची सहकलाकार नुशरत भरूचादेखील उपस्थित होती.
आयुषमानला आपल्या आगामी चित्रपटात 'पूजा'ची भूमिका साकारण्याबद्दल उत्तम समीक्षा लाभत असून ही खास संकल्पना सेलिब्रेट करण्यासाठी ह्या आठवड्याच्या नच बलियेमध्ये रोल रिव्हर्सल करण्यात आले. यात सर्व पुरूष स्पर्धक मुलींच्या वेशात तर स्त्रिया स्पर्धक पुरूषांच्या रूपात दिसून आल्या. काहीतरी वेगळे करण्यासाठी परीक्षक रवीना टंडननेआयुषमान खुराणा आणि अहमद खान यांना हील्सवर नाचण्याचे आव्हानही दिले कारण आयुषमान आपल्या चित्रपटात ड्रीमगर्ल साकारत आहे.
या ट्रेलरमध्ये आयुषमानचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याचे चाहते 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे.