प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीचे कॅलेंडर खूप चर्चेत आले आहे. बॉलिवूडमधील कलाकार डब्बूच्या कॅलेंडरसाठी खास फोटोशूट करतात. डब्बूने २०२०चे कॅलेंडर नुकतेच लाँच केले आहे आणि यात सर्व स्टार्सचे फोटोशूट पहायला मिळते आहे. मात्र या सगळ्यात सर्वात जास्त बोल्ड फोटोशूट आहे ते भूमी पेडणेकर व कियारा आडवाणीचे. कियारा अडवाणीचा हा फोटो सोशल मीडियावर जास्त व्हायरल होतो आहे. कियाराने टॉपलेस फोटोशूट केले आहे.
कियाराच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचं तर मागील काही दिवसांपासून कियारा करियर ग्राफ उंचावत आहे. कियारा शेवटची कबीर सिंग व गुड न्यूज चित्रपटात दिसली होती. या दोन्ही चित्रपटातील तिच्या भूमिकेची सगळीकडे खूप प्रशंसा झाली आहे. इतकेच नाही तर या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे.