भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना मालिका २-१ अशी जिंकली. शुभमन गिलचे ( Shubman Gill) विक्रमी शतक आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. शुभमनने आजच्या या नाबाद १२६ धावांच्या खेळीने मोठमोठे विक्रम मोडले. त्याच्या फटकेबाजीनंतर भारतीय जलदगती गोलंदाजांनी कमाल केली.
शुभमन गिलने १२ चौकार व ७ षटकारांसह १२६ धावांवर नाबाद राहिला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात युवा वयात शतक झळकाण्याचा विक्रमही शुभमनने नावावर केला. तो २३ वर्ष व१४६ दिवसांचा आहे आणि त्याने सुरेश रैनाचा ( २३ वर्ष व १५६ दिवस) विक्रम मोडला. शुभमनच्या या विक्रमासोबत आणखी एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगत असतात. मात्र काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत शुभमन गिल लंडनमधील एका हॉटेलमध्ये दिसला होता. त्यानंतर सारा तेंडुलकर नव्हे, तर सारा खान हिच्यासोबतच्या नात्याची चर्चा रंगू लागली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शुभमन गिल आणि सारा खानसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका यूजर्सने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सारा खान आणि शुभमन गिल एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो विमानतळाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सारा खान आणि शुभमनच्या या फोटोमुळे त्यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. सदर फोटो नवीन आहे की जूना याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र शुभमन आणि सारा खान यांच्यात काहीतरी नक्कीच सुरु आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
दोन 'सारा' मध्ये फसलेला, आता तिसरी आली
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगत असतात. अशातच एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. एक चाहती मैदानात एक पोस्टर घेऊन उभी होती. यामध्ये टिंडर, शुभमनसोबत मॅच करा, असं लिहिलं होतं.
शुभमन गिलनं शानदार शतक-
तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने १६८ धावांनी मोठा विजय मिळवत मालिकाही जिंकली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं २३५ धावाचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवलं. यावेळी भारताकडून युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं शानदार शतक झळकावलं आहे. त्यानंतर कर्णधार हार्दिकनं ४ विकेट्स घेत इतर गोलंदाजाच्या मदतीनं न्यूझीलंडला ६६ धावांत सर्वबाद करत सामना धावांनी जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"