Join us  

अल्लू अर्जुन आणि महेश बाबूसोबतच्या सिनेमांना अनुष्का शर्माने दिला होता नकार, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:12 PM

साऊथच्या अनेक सिनेमांचे बॉलिवूडमध्ये रिमेक बनले आहेत.  आलिया भट्ट आणि अजय देवगनसारखे स्टार्स साऊथ इंडियन सिनेमा RRR मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील (Tollywood) अंतर आता फारच कमी झालं आहे. अल्लू अर्जुनच्या Allu Arjun) ब्लॉकबस्टर 'पुष्पा' सिनेमाने हे अंतर कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. दोन्ही इंडस्ट्रीतील सुपरस्टार्स आणि दिग्दर्शक आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी सज्ज आहेत. 

साऊथच्या अनेक सिनेमांचे बॉलिवूडमध्ये रिमेक बनले आहेत.  आलिया भट्ट आणि अजय देवगनसारखे स्टार्स साऊथ इंडियन सिनेमा RRR मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण एक काळ असाही होता जो इतका सोपा नव्हता.२०११ ते २०१४ दरम्यान टॉलिवूड दिग्दर्शकांना अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टॉलिवूड अभिनेत्यांसोबत कास्ट करायचं होतं. पण त्यावेळी मानधन आणि डेट्समुळे ते शक्य होऊ शकलं नाही. 'फिल्मी बीट'च्या एका रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माने (Anushka Sharma) टॉलिवूडच्या टॉप मोस्ट अभिनेत्यांसोबत सिनेमे कऱण्याची ऑफऱ नाकारली होती.

या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माला ज्यूनिअर एनटीआरसोबत एक सिनेमा ऑफर करण्यात आला होता. त्यानंतर तिला अल्लू अर्जुनसोबतही एक सिनेमा ऑफर करण्यात आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन हरीश शंकर करत होते.

इतकंच नाही तर अनुष्काला टॉलिवूडचा प्रिन्स म्हटला जाणाऱ्या सुपरस्टार महेश बाबूसोबतही एका सिनेमाची ऑफर आली होती. पण अनुष्काने हे तिन्ही सिनेमे करण्यास नकार दिला होता.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमांच्या दिग्दर्शकांनी अनुष्काला संपर्क केला होता. मात्र, मानधन आणि डेट्समुळे हे जुळून येऊ शकलं नाही. त्यावेळी अनुष्काचं करिअर जोरात होतं. ती या काळात पीके,  बॅंड बाजा बारात, सुल्तान, रब ने बना दी जोडीसारख्या सिनेमांचा भाग होती. पण नंतर काही वर्षाने विराट कोहलीसोबत लग्न केलं आणि आता ती निवडक सिनेमात दिसते. अनुष्का तिच्या प्रॉडक्शन हाऊसमुळेही बिझी आहे. 

टॅग्स :अनुष्का शर्माTollywoodबॉलिवूडमहेश बाबूज्युनिअर एनटीआरअल्लू अर्जुन