ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या आगामी रोबोट २ सिनेमात फाईटच्या एका दृश्यावर तब्बल वीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. रोबोट २ हा २०१० मध्ये आलेल्या रोबोट १ चा दुसरा भाग आहे.
बॉलिवुडलाईफ डॉटकॉमच्या वृत्तानुसार रोबोट २ मध्ये रजनी आणि अक्षयच्या फाईट सीनसाठी जो सेट डिझाइन करण्यात येणार आहे. त्याची किंमत २० कोटी रुपये आहे. महत्वाचे म्हणजे हा सीन शूट झाल्यानंतर हा सेट नष्ट करण्यात येईल. त्यामुळे वीस कोटी रुपये फक्त एका फाईट सीनवर खर्च होणार आहेत.
दक्षिणेतील प्रसिध्द दिग्दर्शक शंकर भव्य-दिव्य सिनेमे बनवण्यासाठी ओळखले जातात. रोबोट २ हा आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा असून, बाहुबलीपेक्षा या चित्रपटाचे बजेट जास्त आहे. अक्षय या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असून मार्च महिन्यात तो चित्रीकरण सुरु करेल. भव्य-दिव्यतेत हा सिनेमा कुठेही कमी पडणार नाही याची काळजी शंकर यांनी घेतली आहे.