बॉलिवूडची कॉन्ट्रॉव्हर्शियल क्वीन कंगना रानौत सध्या तिचा आगामी चित्रपट 'पंगा'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. कंगना फार क्वचितच कौतूक करताना दिसते. एकीकडे दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये विद्यार्थ्याच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून तिला ट्रोल केलं जात आहे. मात्र कंगनाने दीपिका पदुकोणच्या छपाक चित्रपटाची प्रशंसा केली. तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका व मेघना गुलजार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी कंगनाची बहिण रंगोलीनं सुद्धा छापाक ट्रेलर रिलीज झाल्यावर दीपिकाचं कौतुक केलं होतं.
कंगनाचा हा व्हिडीओ बहीण रंगोलीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कंगना म्हणाली, ‘मी छपाक सिनेमाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर पाहिल्यावर मला माझी बहीण रंगोलीची आठवण आली. तिच्यासोबत घडलेला तो अपघात तिच्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या बहीणीनं त्यानंतर जी हिंमत दाखवली ती मला प्रेरित करते. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी सामना करण्याची ताकद देते. तिचं हसणं मला प्रत्येक दुःख व वाईट प्रसंगांशी लढण्याची ताकद देते.'