Join us

एक हजारो में...मेरी बहना है

By admin | Published: August 18, 2016 4:39 AM

आ जच्या मुली स्वतंत्र असून, त्यांना खरे तर कोणाच्या आधाराची किंवा मदतीची गरज नसते, पण लहानपणापासून आपला भाऊ हा रक्षणकर्ता असल्याचे मुलींच्या मनावर बिंबवले

आ जच्या मुली स्वतंत्र असून, त्यांना खरे तर कोणाच्या आधाराची किंवा मदतीची गरज नसते, पण लहानपणापासून आपला भाऊ हा रक्षणकर्ता असल्याचे मुलींच्या मनावर बिंबवले जाते. भाऊ बहिणीचे रक्षण करण्यासोबतच तिच्यावर तितकेच प्रेमदेखील करतो. भाऊ-बहिणीचे नाते हे खूपच वेगळे असते, पण ज्या मुलींना भाऊ नाही त्यांचे काय? मराठी चित्रपटसृष्टीतदेखील काही अभिनेत्री आहेत, ज्यांना भाऊ नसले, तरी जिव्हाळ्याच्या बहिणी आहेत. या अभिनेत्री त्यांच्या लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधन कशी साजरी करतात, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या...स्पृहा जोशी : माझी लहान बहीण क्षिप्रा आणि माझे नाते खूपच वेगळे आहे. आम्ही दोघी एकमेकींशिवाय राहूच शकत नाही. दोन दिवस जरी आम्ही एकमेकींशी बोललो नाही किंवा एकमेकींना भेटलो नाही, तरी आम्हाला करमत नाही. ती आंतरराष्ट्रीय पातळीवर जिम्नॅशियम हा खेळ खेळते. ती घेत असलेली मेहनत आणि तिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी करावा लागलेला स्ट्रगल मी खूप जवळून पाहिलाय. बहीण म्हणून मला क्षिप्राचा खूपच अभिमान वाटतो. माझ्या आईमधील सर्वच गुण मला नेहमीच तिच्यात दिसतात.भार्गवी चिरमुले : पूर्वीच्या काळी भाऊ हा बहिणीचा रक्षणकर्ता आहे, असे म्हटले जात असे, पण आता बदलत्या काळानुसार रक्षणासाठी भावांची गरज राहिलेली नाही. बहीणदेखील अडचणीच्या काळात आपल्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू शकते. माझी बहीण चैत्राली माझ्यापेक्षा लहान असली, तरी माझी खूपच काळजी घेते. आम्ही दोघी जवळच राहतो. ती मला रोज फोन करून तू जेवलीस का? काय खाल्ले? असे विचारत असते. माझ्या खाण्या-पिण्याची ती सतत काळजी घेते. सिनेमाला किंवा शॉपिंगला मी तिच्याशिवाय जाण्याचा विचारच करू शकत नाही. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नाते टिकवणे फार महत्त्वाचे आहे.समिधा गुरू : मला भाऊ नसल्याने मी लहानपणापासूनच माझ्या बहिणीला राखी बांधत आली आहे. भाऊ नसला म्हणून काय झाले, बहीण तर आहे ना... भाऊ आपले रक्षण करतो, म्हणून आपण त्याला राखी बांधतो, पण माझी बहीणच माझे रक्षण करते. त्यामुळे मी तिला राखी का बांधू नये, असा प्रश्न मला पडला आणि तेव्हापासून मी रक्षाबंधन किंवा भाऊबीज माझ्या बहिणीसोबतच साजरी करायला लागले. माझी बहीण मृणाल माझ्यापेक्षा मोठी आहे. सातवी-आठवीत असल्यापासूनच मी तिला राखी बांधते. त्यामुळे मला असे वाटते की, आपण भाऊ किंवा बहीण असा भेदभाव करणेच चुकीचे आहे. खुशबू तावडे : माझी लहान बहीण तितिक्षा ही मला कोणत्याही भावापेक्षा कमी नाही. लहानपणी आम्हाला नेहमी विचारले जायचे की, तुम्हाला भाऊ नाही, याचे तुम्हाला वाईट नाही वाटते का? पण याचे आमचे उत्तर नेहमीच ‘नाही’ असेच असायचे. आई-वडिलांनी आम्हाला अगदी मुलाप्रमाणे वाढवले आहे. भाऊ नसला, तरी आम्ही दोघी रक्षाबंधनाला एकमेकींना गिफ्ट देतो. आम्ही घरापासून लांब राहात असलो, तरी आम्ही अडचणीच्या काळात घरातल्यांना मदत करायला नेहमीच तत्पर असतो. तितिक्षा माझ्यापेक्षा लहान असली, तरी काही वेळा ती मोठ्या बहिणीसारखी वागते. माझ्या सगळ्याच गोष्टीत तितिक्षाचा मला नेहमीच पाठिंबा असतो.