Join us

Golden Globe Awards 2024: 'ओपनहायमर' फेम किलियन मर्फीला मिळाला 'गोल्डन ग्लोब', वाचा पुरस्काराची संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 10:48 IST

२०२३ मध्ये रिलीज झालेला सर्वात चर्चेतील सिनेमा 'ओपनहायमर' चा यंदाच्या गोल्डन ग्लोबमध्ये दबदबा

Golden Globe Awards 2024: गोल्डन ग्लोब हा जगातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. नुकतंच गोल्डन ग्लोब पुरस्कार वितरण सोहळा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे पार पडला आहे. अमेरिकी स्टँडअप कॉमेडियन जो कोय ने यंदा सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. यावर्षी 'बार्बी' (Barbie) आणि 'ओपनहायमर' (Oppenheimer) चा दबदबा पाहायला मिळाला.'ओपनहायमर' सिनेमाला एकूण 4 पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये मुख्य अभिनेता किलियन मर्फीने 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'चा पुरस्कार पटकावला आहे.

2023 साली रिलीज झालेल्या 'बार्बी','ओपनहायमर' आणि 'बीफ' या सिनेमांना गोल्डन ग्लोबमध्ये सर्वाधिक नामांकने मिळाली. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले होते. क्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपनहायमर' हा सर्वात चर्चेतला सिनेमा होता. या सिनेमाला ८ नामांकने मिळाली असून त्यापैकी ४ पुरस्कार सिनेमाने पटकावले आहेत. मुख्य अभिनेता किलियन मर्फीला 'बेस्ट अॅक्टर(ड्रामा)' पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. तर दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन यांना 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कार मिळाला. रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार' ठरला. सिनेमाने बेस्ट ओरिजनल स्कोर, मोशन पिक्चरचेही पुरस्कार पटकावले.

कॉमेडियन आणि अभिनेत्री अली वोंगला 'बीफ' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री(लिमिटेड सिरीज)साठी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार पटकावणारी ती मूळची पहिली आशियाई अभिनेत्री आहे. तर एलिजाबेथ डेबिकीने 'द क्राऊन' सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कार पटकावला. डेबिकीने राजकुमारी डायना बनून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

टॅग्स :गोल्डन ग्लोबकॅलिफोर्नियाहॉलिवूडसिनेमा