Most Popular Actress In India: पुन्हा बॉलिवूडवर साऊथ भारी पडल्याचं पाहायला मिळतयं. साऊथ सुंदरीनं अभिनत्री दीपिका पादुकोण आणि आलिया भटलाही लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकलं आहे. फेब्रुवारी २०२५ मधील भारतातील सर्वात लोकप्रिय महिला कलाकारांची यादी ऑरमॅक्स मीडियाने जाहीर केली आहे. या यादीत १० सुंदरींची नावे आहेत, ज्यात बॉलिवूडपासून ते दक्षिण इंडस्ट्रीपर्यंतच्या अभिनेत्रींचा समावेश आहे. यावेळी, लोकप्रियतेच्या बाबतीत दक्षिणेकडील अभिनेत्रीने आघाडी घेतली आहे.
लोकप्रियतेच्या यादीत दक्षिणेकडील अभिनेत्रींचे वर्चस्व दिसतंय. १० पैकी ८ नावे दक्षिणेतील अभिनेत्रींची आहेत. अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही भारतातील सर्वात लोकप्रिय महिला चित्रपट कलाकारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर तर दीपिका पदुकोणचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे. साई पल्लवी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत काजल अग्रवाल पाचव्या स्थानावर आणि रश्मिका मंदान्ना सहाव्या स्थानावर आहे. यासोबतच त्रिशा कृष्णननं सातवं स्थान पटकावलं आहे.
नयनतारा ही आठव्या क्रमांकावर, श्रीलीला नवव्या क्रमांकावर आणि अनुष्का शेट्टी दहाव्या क्रमांकावर आहे. अभिनेत्रींसोबतच सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांची यादी देखील जाहीर झाली. प्रभास हा सर्वात लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. तर थलापती विजयचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि अल्लू अर्जुनचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत शाहरुख खान चौथ्या स्थानावर आहे आणि राम चरण पाचव्या स्थानावर आहे. एकूणच दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी वर्चस्व गाजवलं आहे.