Join us

ओरीला यश मिळण्यात 'या' अभिनेत्रीचा मोठा वाटा! आता आहे इंडस्ट्रीतून गायब, अमिताभ बच्चनसोबत केलं होतं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:18 IST

बॉलिवूड सेलिब्रिटींचा लाडका ओरीला लोकप्रिय करण्याागे एका अभिनेत्रीचा हात आहे. ही अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरीही तिने एक काळ गाजवलाय.

बॉलिवूडमध्ये सर्वांचा लाडका असलेला ओरी सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. ओरीचं (orry) फोटो काढणं, सेलिब्रिटींसोबत खास पोज देणं, त्याच्या मोबाईलचे अतरंगी कव्हर अशा अनेक गोष्टी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतात. ओरी आज सिनेमा आणि जाहिरातींमध्ये चमकतोय. ओरीला आज जे यश आणि प्रसिद्धी मिळाली आहे, त्यामध्ये एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा मोठा वाटा आहे. ही अभिनेत्री सध्या इंडस्ट्रीतून गायब असली तरीही तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलंय.

या बॉलिवूड अभिनेत्रीने ओरीला केलं फेमस

ओरीला फेमस करण्यामध्ये ज्या अभिनेत्रीचा वाटा आहे त्या अभिनेत्रीचं नाव आहे किम शर्मा. किमने शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'मोहब्बते' सिनेमात अभिनय केलाय. ओरीला स्टार करण्यामागे किमचं मोलाचं योगदान आहे. इतकंच नव्हे तर ओरीचं नेटवर्थ सध्या १० कोटी होण्यामध्येही किम शर्माचंच डोकं आहे. 

एका पॉडकास्टमध्ये किमने खुलासा केला होता की, "ओरीच्या आपसास जे काही रहस्यमयी वलय आहे ती आमची स्ट्रॅटेजी आहे. आम्ही अनेक प्रश्नांची उत्तरं माहित असूनही देत नाही. ओरीसोबत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. ओरी हा खूप हुशार आणि करिअरवर फोकस असणारा माणूस आहे. ओरी फक्त एक इन्फ्लुएन्सर नसून तो एका सेलिब्रिटीसारखा आहे." किम शर्मा ओरीच्या मॅनेजरचं काम करते,  असं सांगण्यात येतं.

किम शर्माने बॉलिवूडचा एक काळ गाजवला

किम शर्माने एका मॉडेलच्या रुपात करिअर म्हणून सुरुवात केली. २००० साली शाहरुख खान-ऐश्वर्या राय बच्चनचा स्टार 'मोहब्बते' सिनेमात काम केलं होतं. किमने या सिनेमात जुगल हंसराजसोबत काम केलं होतं. याशिवाय किमने 'फिदा', 'तुमसे अच्छा कौन है', 'लेडीज टेलर' या सिनेमात किमने काम केलं. २०११ साली आलेल्या 'लूट' या सिनेमात काम केल्यानंतर किम इंडस्ट्रीतून गायब झाली. पण सध्या ती ओरीसोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मॅनेजरची जबाबदारी सांभाळत आहे.

टॅग्स :किम शर्माबॉलिवूडशाहरुख खानऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चनजुगल हंसराज