Join us

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, ओरीने कोणाला मत दिलं? पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:05 IST

ओरीने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केलं आहे.

Orry Citizenship : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून ते आता अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.  ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. त्यांना ५० राज्यांतील ५३८ जागांपैकी २९५ जागांवर विजय मिळाला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला २७०चा आकडा त्यांनी ओलांडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर जगभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. तुम्हाला माहितेय बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी अमेरिकाचे नागरिकत्व पत्करलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनीही मतदान केलं. 

कायम सेलिब्रिटींमध्ये दिसणारा ओरहान अवत्रामणी म्हणजे ओरीने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केलं आहे. कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी कोणाला मतदान केलं, हेदेखील ओरीने सांगितलं आहे.  ओरीने खुलासा केलाय की त्याने भारतीय वशांच्या कमला हॅरिस यांना नाही तर थेट डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मत दिलं.

ओरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. "आम्ही करून दाखवलं डोनाल्ड... २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्याचा मला अभिमान वाटतो" असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. त्याने पोस्टमध्ये काही फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये ओरीने ट्रम्प यांना मत दिल्याच दिसून येत आहे. ओरीच्या मतदानाने त्याच्या भारतीय चाहत्यांना तो अमेरिकन नागरिक असल्याचे कळले आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाAmerica Election