oscar 2023: कलाविश्वातील प्रतिष्ठेचा आणि तितकाच महत्त्वाचा मानला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर (Oscar). या पुरस्कार सोहळ्याला ९० वर्षांपेक्षाही जास्त वर्षांची परंपरा आहे. Oscar 2023 हा पुरस्कार सोहळा १२ मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये होत असून भारतीय वेळेनुसार हा सोहळा आपल्याला १३ मार्चच्या पहाटे ५:३० वाजता पाहता येईल. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर आणि खासकरुन कलाविश्वात या पुरस्कार सोहळ्याची तुफान चर्चा रंगली आहे. परंतु, या पुरस्कार सोहळ्याचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का? ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचं खरं नाव काही वेगळचं आहे. त्यामुळे ते नाव व त्यामागचा इतिहास जाणून घेऊयात.
काय आहे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं खरं नाव
ऑस्कर अवॉर्डचं ऑफिशिअल नाव 'अकादमी अॅवॉर्ड ऑफ मेरिट' असं आहे. हा पुरस्कार अमेरिकन अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँण्ड सायन्स (AMPAS) यांच्याद्वारे दिला जातो. कलाविश्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या दिग्दर्शक, कलाकार, लेखक यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. १९२९ मध्ये हॉलिवूड रुजवेल्ट हॉटेल येथे पहिल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी केवळ५ रुपये डॉलर इतकं या कार्यक्रमाचं तिकीट होतं. इतकंच नाही तर हा कार्यक्रम केवळ १५ मिनिटांचाच होता.
ऑस्करच्या ट्रॉफीवर खरंच विजेत्याचा हक्क असतो?
1950 मध्ये लागू केलेल्या नियमानुसार, ऑस्कर विजेत्या कलाकाराचा या ट्रॉफीवर पूर्ण हक्क नसतो. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी विजेत्यांना एक करार करावा लागतो. त्यानुसार, ही ट्रॉफी विजेत्यांना १ डॉलरमध्ये पुन्हा अकादमीला विकावी लागते. जर विजेत्यांनी ती विकण्यास नकार दिला तर ती ट्रॉफी विजेत्यांना आपल्या जवळ ठेवता येत नाही.