RRR : एस एस राजामौली (SS Rajamauli) यांच्या आरआरआर (RRR) सिनेमाची चर्चा अजुनही सुरुच आहे. भारतातच नाही तर जगात आरआरआर (RRR) चित्रपटाचं कौतुक होत आहे. सिनेमाने आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. आता RRR' मधील 'नातू नातू' हे गाणे ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. हे गाणे सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत निवडले गेले आहे, जे ऑस्कर 2023 साठी निवडलेल्या 15 गाण्यांपैकी एक आहे. ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट केलेले हे भारतातील पहिलं गाणे आहे.
राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट आरआरआर या वर्षी 25 मार्च रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. त्याची देशातच नाही तर परदेशातही गाजला. 'नातू नातू' गाणं ऑस्करमध्ये शॉर्ट लिस्ट होताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या यादीत ‘अवतार- द वे ऑफ वॉटर’. ‘ब्लॅक पॅंथर – वाकांडा फॉर एव्हर’, आणि ‘टॉप गन – मॅवरिक’ अशा चित्रपटातील गाण्यांचाही समावेश आहे. आरआरआर हा चित्रपट बनवण्यासाठी ५५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाने जगभरात १,२२४ कोटींची कमाई केली आहे. एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला तेलुगू भाषेतील एपिक अॅक्शन ड्रामा चित्रपट. हा चित्रपट दोन वास्तविक जीवनातील भारतीय क्रांतिकारक, त्यांची काल्पनिक मैत्री आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धचा त्यांचा लढा याभोवती केंद्रित आहे.