Join us

Oscar 2024 : सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, दिग्दर्शक अन्...; ऑस्करमध्ये 'ओपनहायमर'ची बाजी, पटकावले 'इतके' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 8:00 AM

96th Academy Awards : Oppenheimer ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, किलियन मर्फीला बेस्ट अभिनेता आणि ख्रिस्तोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

96th Academy Awards : मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजल्या जाणाऱ्या  ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा ९६व्या अकादमी पुरस्कार कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडत आहे. ऑस्कर सोहळ्यातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

२०२३मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला ओपनहायमर सिनेमा यंदाचा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. ओपनहायमरने ऑस्कर २०२४ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. तसंच आणखीही काही पुरस्कार या सिनेमाने नावावर केले आहेत.  यंदाच्या ऑस्करमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक या पुरस्कारांवर ओपनहायमर या सिनेमाने नाव कोरलं आहे. 

ओपनहायमरमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या किलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांना ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. याबरोबरच ओपनहायमधील भूमिकेसाठी रॉबर्ट डाउनी ज्युनिअरला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ऑस्कर २०२४ मध्ये ओपनहायमर, पुअर थिंग्ज आणि बार्बी या सिनेमाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती. त्यामुळे या सिनेमांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळाली. यंदाच्या ऑस्करमध्ये ओपनहायमर सिनेमान तब्बल ७ अवॉर्ड नावावर केले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, साहायक्क अभिनेता आणि दिग्दर्शक याबरोबरच ओरिजनल स्कोअर, सिनेमॅटोग्राफी, फिल्म एडिटिंग या कॅटेगरीतही ओपनहायमरला ऑस्कर मिळाला आहे. 

टॅग्स :ऑस्करसिनेमासेलिब्रिटी