Join us

Oscar 2024 : ५ मिनिटे उशिरा सुरू झाला ऑस्कर सोहळा; समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 5:56 AM

96th Academy Awards 2024: ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळा सायंकाळी ४ वाजता सुरू होणार होता. पण, काही कारणांमुळे हा सोहळा ५ मिनिटे उशीरा सुरू झाला.

Oscar 2024 : ऑस्कर २०२४ हा मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा  पुरस्कार आहे. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत आहे. १० मार्चला रात्री (भारतीय वेळेनुसार सकाळी ५ वाजता) या सोहळ्याची सुरुवात झाली. पण, पहिल्यांदाच ऑस्कर सोहळा नियमित वेळेच्या ५ मिनिटे उशिरा सुरू झाला. 

डॉल्बी थिएटरच्या बाहेर जवळपास ३५० आंदोलकांनी जमले होते. इस्राइल-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाविरोधात डॉल्बी थिएटरबाहेर जमलेल्या आंदोलकांनी घोषणा दिल्या. डॉल्बी थिएटरबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना लॉस अँज्लेस पोलिसांनी रोखलं. पण, या आंदोलनामुळे ऑस्कर सोहळा सुरू होण्यास ५ मिनिटे उशीर झाला. ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळा सायंकाळी ४ वाजता सुरू होणार होता. पण, डॉल्बी थिएटरबाहेरील या आंदोलनामुळे ऑस्कर सोहळ्यास विलंब झाला. 

दरम्यान, यंदाच्या ऑस्कर २०२४ मध्ये २३ श्रेणींसाठी नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये भारताच्या 'टू किल अ टायगर' या डॉक्युमेंट्री फिल्मला नामांकन मिळालं आहे.  दिग्दर्शिका निशा पहुजा यांनी ही डॉक्युमेंट्री फिल्म दिग्दर्शित केली आहे. 

टॅग्स :ऑस्कर