Join us

Oscar Awards 2022 : 'द पॉवर ऑफ डॉग'ला मिळालं सर्वाधिक नामांकन; 'जय भीम' ऑस्करच्या शर्यतीतून बाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 8:29 PM

Oscar awards 2022: 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाची निर्मिती नेटफ्लिक्सने केली असून या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे १२ नामांकन मिळाली आहेत.

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये 'द पॉवर ऑफ डॉग' या चित्रपटाला सर्वाधिक नामांकन मिळालं आहे. तर, अभिनेता सूर्या याचा 'जय भीम' हा चित्रपट मात्र ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे.संध्याकाळी ७ वाजल्यापासून लाईव्ह स्ट्रीमद्वारे या पुरस्कार सोहळ्याची घोषणा केली जात असून पुरस्कारच्या नामांकनांची घोषणा ट्रेसी एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डन हे करत आहेत. 

'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाची निर्मिती नेटफ्लिक्सने केली असून या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे १२ नामांकन मिळाली आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन जिनी कॅम्पियन यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या खालोखाल वॉर्नर ब्रदर्सच्या 'ड्यून' या सिनेमाला १० नामांकन मिळाली आहेत. 

दरम्यान, 'जय भीम' या चित्रपटाला नामांकन मिळावं अशी असंख्य भारतीयांची इच्छा होती. मात्र, ऑस्करच्या शर्यतीमध्ये हा चित्रपट यशस्वी घोडदौड करु शकला नाही. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी २७ जानेवारीपासून मतदान सुरु झालं होतं. हे मतदान १ फेब्रुवारीपर्यंत सुरु होतं.

टॅग्स :ऑस्कर नामांकनेहॉलिवूड