लॉस एंजलिसमध्ये 95 व्या ऑस्कर सोहळ्याला (Oscars 2021) आता सुरुवात झाली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष Oscar 2023 कडे लागलं आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठीही खास असणार आहे. कारणही खास आहे. यंदाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार जिंकणारा साऊथचा सिनेमा RRR देखील ऑस्करच्या शर्यतीत सामील आहे. तसेच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही प्रेजेंटर म्हणून या पुरस्कार सोहळ्यात हजर झाली आहे. दीपिका आणि आरआरआर या चित्रपटाच्या टीमनं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला.
आरआरआर चित्रपटाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या टीमनं रेड कार्पेटवर वॉक केला. तर दीपिकानं ऑस्कर 2023 साठी केलेल्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. दीपिकानं ऑस्कर सोहळ्यासाठी ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला. तसेच तिनं एक खास नेकपिस देखील परिधान केला होता. दीपिकानं तिच्या या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यासाठी ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहेत. तर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी जांभळा कुर्ता आणि धोती अशा ट्रेडिशन लूक केला आहे.