Oscar Awards 2023: भारताला मिळाला पहिला ऑस्कर, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 07:33 AM2023-03-13T07:33:08+5:302023-03-13T10:46:56+5:30

द एलिफंट व्हिस्परर्स’ ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे.

Oscar awards 2023 guneet monga the elephant whisperers wins the oscar for best documentary short film | Oscar Awards 2023: भारताला मिळाला पहिला ऑस्कर, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने रचला इतिहास

Oscar Awards 2023: भारताला मिळाला पहिला ऑस्कर, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने रचला इतिहास

googlenewsNext

आजचा दिवस  भारतासाठी खूप आनंदाचा आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers) या शॉर्टफिल्मला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे. लॉस एंजलिसमध्ये 95 व्या ऑस्कर सोहळ्याला (Oscars 2021) डॉल्बी थिएटरमध्ये सुरुवात झाली आहे.‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे.  

गुनीत मोंगा यांची पहिली प्रतिक्रिया 
ऑस्कर जिंकल्यानंतर गुनीत मोंगा यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्कर अवॉर्ड हातात घेऊन त्यांनी फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले- 'आजची रात्र ऐतिहासिक आहे. कारण भारतासाठी हा पहिलाच ऑस्कर आहे. धन्यवाद आई-बाबा, गुरुजी शुक्राना, माझे सह-निर्माते अचिन जैन, टीम सिख्या, नेटफ्लिक्स, आलोक, सराफिना, डब्ल्यूएमई बॅश संजना.

सिनेमाची कथा
द एलिफंट व्हिस्परर्स’मध्ये तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाची कथा आहे.  ते दोन बेबंद हत्ती यांना दत्तक घेतात आणि त्यांचं कसं संगोपन करतात यावर ही बेतलेली आहे. ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांनी डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली आहे. कार्तिकी गोन्साल्विस यांनी  दिग्दर्शन केलं आहे.
 

 

Web Title: Oscar awards 2023 guneet monga the elephant whisperers wins the oscar for best documentary short film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर