Join us

Oscars 2023: ‘नाटू नाटू’ला ऑस्कर! एस. एस. राजामौली यांच्या RRRची ऐतिहासिक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 8:27 AM

अँड ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानात साठवण्यासाठी भारत आसुलेला होता. एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटानं ऑस्करवर आपलं ...

अँड ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानात साठवण्यासाठी भारत आसुलेला होता. एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटानं ऑस्करवर आपलं नाव लिहित संपूर्ण देशाचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्या आरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यानं ऑस्कर आपल्या नावावर केला आहे. भारताच्या 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग्सचा पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटू या गाण्यानं ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे.  कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला ऑस्कर मिळाल्याची घोषणा व्यासपीठावरून झाली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला.

आरआरआर हा चित्रपट बनवण्यासाठी ५५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाने जगभरात १,२२४ कोटींची कमाई केली आहे. एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला तेलुगू भाषेतील एपिक अॅक्शन ड्रामा चित्रपट. हा चित्रपट दोन वास्तविक जीवनातील भारतीय क्रांतिकारक, त्यांची काल्पनिक मैत्री आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धचा त्यांचा लढा याभोवती केंद्रित आहे.

या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

टॅग्स :ऑस्करआरआरआर सिनेमा