कलाविश्वातील सर्वाधिक महत्त्वाचा आणि मानाचा मानला गेलेला पुरस्कार म्हणजे ऑस्कर. गेल्या सुमारे ९० हून जास्त वर्षांपासून ऑस्कर पुरस्कार दिला जात आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकाराला एकदा तरी ऑस्करचे स्वप्न पडल्याशिवाय राहात नाही. मात्र, ते सत्यात उतरणे अतिशय कठीण असल्याचे सांगितले जाते. एकाहून एक दर्जेदार चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत असतात. १२ मार्च म्हणजे रविवार अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. यावेळचा ऑस्कर भारतासाठीही खूप खास आहे 'RRR' देखील ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. भारतीय त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच आणखी एक बदल होणार आहे जो 62 वर्षात प्रथमच केला जाणार आहे.
अवॉर्ड शो कोणताही असो, त्यात रेड कार्पेटला खूप महत्त्व असते. या रेड कार्पेटवर स्टार्स आपल्या ग्लॅमरचा जलवा दाखवतात. पण तुम्हाला माहित आहे का की 62 वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑस्कर सोहळ्यात कार्पेटचा रंग लाल होणार नाही. यामागचं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रेड कार्पेटच्या रंगात होणार बदल ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर चालणे हे प्रत्येक स्टारचे स्वप्न असते, पण यावेळी रेड कार्पेटचा रंग बदलण्यात येणार आहे. 1961 पासून म्हणजेच 33 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापासून प्रत्येक वेळी रेड कार्पेट घालण्यात आले आहे. मात्र आता ही परंपरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर लाल रंगाऐवजी ऑस्करचे आयोजन करणाऱ्या अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्सने यावेळी 'शॅम्पेन' रंगाची निवड केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण 95 व्या ऑस्करमध्ये अवॉर्ड प्रेजेंटर असेल. तिच्यासोबत एमिली ब्लंट, सॅम्युअल एल जॅक्सन, जेनिफर कोनेली, ड्वेन जॉन्सन, मायकेल बी जॉर्डन, जेनेल मोने, झो सालडाना आणि मेलिसा मॅककार्थी देखील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करतील.