Oscar Awards 2019 Live - अ‍ॅण्ड द 'ऑस्कर' गोज टू..... "ग्रीन बुक', सर्वोत्कृष्ट चित्रपट

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 07:32 AM2019-02-25T07:32:52+5:302019-02-25T11:29:52+5:30

जगातील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार सोहळ्याच्या वितरण समारंभाला सुरूवात झाली आहे. लॉस अंजेलिसच्या रेड कार्पेटवर यंदाचा 91 वा ऑस्कर सोहळा ...

Oscars Awards Live 2019 - Best Documentary Feature for Oscars Free Solo documentary feture | Oscar Awards 2019 Live - अ‍ॅण्ड द 'ऑस्कर' गोज टू..... "ग्रीन बुक', सर्वोत्कृष्ट चित्रपट

Oscar Awards 2019 Live - अ‍ॅण्ड द 'ऑस्कर' गोज टू..... "ग्रीन बुक', सर्वोत्कृष्ट चित्रपट

googlenewsNext

जगातील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार सोहळ्याच्या वितरण समारंभाला सुरूवात झाली आहे. लॉस अंजेलिसच्या रेड कार्पेटवर यंदाचा 91 वा ऑस्कर सोहळा रंगत आहे. यंदाच्या अ‍ॅवॉर्ड शोला कुणीही होस्ट करत नाही, हे यंदाच्या सोहळ्यातील वेगळपण ठरलं आहे. याअगोदर 30 वर्षापूर्वीही कुणीही या सोहळ्याला होस्ट केलं नव्हत. ऑस्कर सोहळ्यात हॉलिवूडच्या दिग्गजांनी एंट्री केली आहे. स्पायडर मॅन चित्रपटालाही ऑस्करचा सन्मान मिळाला आहे. तर ग्रीन बूक हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटा ठरला आहे.

भारतीय निर्मात्या गुनीत मोंगा यांच्या लघुपटाला ऑस्करचा सन्मान मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या हाफुड येथे राहणाऱ्या मुलींवर हा चित्रपट बनविण्यात आला आहे. महिलांच्या मासिक पाळीसंदर्भातील विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. या चित्रपटात भारतीय समाजाची मानसिकता आणि महिलांमध्ये असलेली लज्जा अतिशय सखोलपणे मांडण्यात आली आहे. द एन्ड ऑफ सेन्टेन्स असे या चित्रपटाचे नाव आहे. 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ऑलिव्हिया कोलमन - द फेव्हरिट 
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रमी मॅलेक - बोहेमिन ऱ्हॅप्सडी 

सर्वोत्कृष्ट गाणं - शॅलो - अ स्टार इज बॉर्न
सर्वोत्कृष्ट (आधारित) पटकथा - ब्लॅकक्लॅन्सम
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट (मूळ) पटकथा - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - स्किन
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फर्स्ट मॅन
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट - पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - बाव

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर - स्पायडर मॅन-इन टू द स्पायडर व्हर्स

'फ्री सोलो' या चित्रपटास बेस्ट डॉक्युमेंट्री फिचरसाठी ऑस्करचा बहुमान

LIVE

Get Latest Updates

10:30 AM

हॉलिवूडच्या रेड कार्पेटवर भारतीय दिग्दर्शकाचा झेंडा, 'द एन्ड ऑफ सेन्टेन्स'ला ऑस्कर

भारतीय निर्मात्या गुनीत मोंगा यांच्या लघुपटाला ऑस्करचा सन्मान मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या हाफुड येथे राहणाऱ्या मुलींवर हा चित्रपट बनविण्यात आला आहे. महिलांच्या मासिक पाळीसंदर्भातील विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. या चित्रपटात भारतीय समाजाची मानसिकता आणि महिलांमध्ये असलेली लज्जा अतिशय सखोलपणे मांडण्यात आली आहे. द एन्ड ऑफ सेन्टेन्स असे या चित्रपटाचे नाव आहे. 

09:47 AM

'ऑस्कर'साठी ग्रीन बुक ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

09:42 AM

ऑस्करकडून अल्फोन्सो कॉरोन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान

09:39 AM

ऑस्करकडून ऑलिव्हिया कोलमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान, द फेव्हरिट चित्रपटातील भूमिका

09:39 AM

सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला रमी मॅलेक, चित्रपट होता बोहेमिन ऱ्हॅप्सडी

09:13 AM

निर्माता गुनीत मोंगा यांना ऑस्करचा सन्मान, भारतीयांवर आधारित बनवला होता चित्रपट

सर्वोत्कृष्ट गाणं - शॅलो - अ स्टार इज बॉर्न
सर्वोत्कृष्ट (आधारित) पटकथा - ब्लॅकक्लॅन्सम
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट (मूळ) पटकथा - ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - स्किन
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फर्स्ट मॅन
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट - पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - बाव

09:09 AM

बेस्ट ऑरिजनल स्क्रीन प्लेसाठी ग्रीन बुक चित्रपटाला पुरस्कार

08:16 AM

मेहरशाला अली यास सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा ऑस्कर सन्मान

07:44 AM

सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा विभागात 'रोमा' ठरला ऑस्करचा मानकरी

07:41 AM

सर्वोत्कृष्ट वेशभुषेसाठी ब्लॅक पंथरला पुरस्कार

07:36 AM

ऑस्कर विजयानंतर अभिनेत्री रेजिना किंगला अश्रू अनावर, आईचे मानले आभार

रेजिना किंगला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीची पुरस्कार

Web Title: Oscars Awards Live 2019 - Best Documentary Feature for Oscars Free Solo documentary feture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.