Join us

८० विदेशी चित्रपटांना टक्कर देत ‘कोर्ट’ला आॅस्करचे नामांकन

By admin | Published: October 13, 2015 11:51 PM

भारतातल्या बिगबजेट चित्रपटांना बाजूला करत चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाने 88 व्या अ‍ॅकॅडमी अ‍ॅवार्डस मध्ये नामांकन मिळविले...पण यासाठी अटीतटीची लढत ‘कोर्ट’ ला द्यावी लागली.

भारतातल्या बिगबजेट चित्रपटांना बाजूला करत चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाने 88 व्या अ‍ॅकॅडमी अ‍ॅवार्डस मध्ये नामांकन मिळविले...पण यासाठी अटीतटीची लढत ‘कोर्ट’ ला द्यावी लागली....या कॅटॅगरीमध्ये जगभरातील विविध चित्रपटसृष्टीमधून आलेल्या तब्बल 80 चित्रपटांचे तगडे आव्हान कोर्टसमोर होते. द अ‍ॅकॅडमी आॅफ मोशन पिक्चर्स आर्टस अ‍ॅण्ड सायन्सने 81 चित्रपटांची यादी जाहीर केली होती. आॅस्करच्या या स्पर्धात्मक विभागामध्ये मूर (पाकिस्तान), डोन्ट बी बँड (इटली), स्टोरी (बांगलादेश), अंडर मिल्क वूड (ब्रिटन), तलकजंग व्हर्सेस तुल्के (नेपाळ) या चित्रपटांचा समावेश होता. या चित्रपटांमधून ‘कोर्ट’च्या नाट्याला अधिक पसंती मिळाली...आता 28 फेब्रुवारीला होणाऱ्या आॅस्कर सोहळ्यात ‘कोर्ट’वर आॅस्करची मोहोर उमटणार का? याची उत्सुकता मराठी रसिकांना लागली आहे.