बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरील वाद बऱ्याच काळापासून सुरू आहे पण सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर हा वाद आणखी चिघळला. सुशांतच्या मृत्यूनंतर फक्त चाहतेच नाही तर कित्येक कलाकारांना धक्का बसला आहे आणि बरेच कलाकार बॉलिवूडमधील घराणेशाही व राजनीतीबद्दल बोलत आहे. नेपोटिझमबद्दल बरेच कलाकार पुढे येऊन बोलत आहेत. यादरम्यान स्टार किड असूनही अभिनेता अभय देओलनेदेखील नेपोटिझमबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने सिनेइंडस्ट्रीतील नेपोटिझमवर निशाणा साधला आहे. अभय देओल म्हणाला, बॉलिवूडमध्ये घराणेशाही कित्येक वर्षांपासून नाही तर कित्येक दशकांपासून चालू आहे. मात्र याविरोधात बोलण्यासाठी कुणी पुढे धजावत नाही. उलट त्यात सहभागी होण्यासाठी तयार होतात. कारण त्यांना माहित आहे तरच ते वाचू शकतात. मी यामुळे बोलू शकतो कारण मी पण एका फिल्मी कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे. हे सगळं मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. बालपणी दुसऱ्यांकडून ऐकत होतो पण मी जेव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा मी स्वतः हे पाहिले.
मी माफी मागतो, सर्वांना जागे करण्यासाठी कुणाचा तरी मृत्यू झाला. मला आनंद आहे की याबद्दल लोक बोलत आहे आणि ऐकत आहे. ते इंडस्ट्रीतील झालेल्या बदलाबद्दल बोलत आहेत. आता खरा प्रेक्षक जागृत झाला असेल अशी मला अपेक्षा आहे. खऱ्या, गुणवान, मेहनती कलाकारांनाच प्रेक्षकांनी प्रोत्साहन द्यावे, बाकीच्यांना मग तो कोणीही असेल कितीही मोठ्या स्टारचा मुलगा, मुलगी असेल त्यांना त्यांची जागी दाखवावी, अशी विनंती आहे. अन्यथा हे घराणेशाहीचं चक्र तुटणार नाही.
ते इंडस्ट्रीत झालेल्या बदलाबद्दल बोलत आहे. सर्वात चांगली बाब ही आहे की आता यावर कलाकारही बोलत आहेत. यापूर्वी अभय देओलने बॉलिवूडमध्ये त्याला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे.