नवी दिल्ली : मनोरंजनाच्या दृष्टीने हा जानेवारी महिना खूपच चांगला जाणार आहे. 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला पठाण ब्लॉकबस्टर ठरणार आहे, पण ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरही भरपूर मनोरंजन आहे. या महिन्यात अनेक चांगल्या वेब सिरीज आणि चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम झाले. महिना संपत आला तरी मनोरंजनाची कमतरता भासणार नाही. आयुष्मान खुरानाच्या 'An Action Hero'पासून ते या महिन्याच्या शेवटी ओटीटीवर 'Saturday Nights' स्ट्रीम होणार आहे. यामधील काही वेब सिरीज आणि चित्रपट जाणून घ्या...
१) सॅटर्डे नाईट (SATURDAY NIGHT)सॅटर्डे नाईट हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही, ते डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) आज म्हणजेच २७ जानेवारीला पाहू शकतात. ही कहाणी अशा चार मित्रांची आहे, जे अनेक वर्षांपासून एकमेकांना भेटलेले नाहीत. ते भेटण्याची आणि त्यांची मैत्री पुन्हा जागृत करण्याचा विचार करतात. सॅटर्डे नाईटची कहाणी नवीन भास्कर यांनी लिहिली आहे. हा एक कॉमेडी ड्रामा आहे. ज्याचे दिग्दर्शन रोशन अँड्र्यू यांनी केले आहे.
२) अॅन अॅक्शन हिरो (AN ACTION HERO)अभिनेता आयुष्मान खुरानाचा हा चित्रपट २७ जानेवारीला नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आयुष्मानचे नाव मानव असे दाखवण्यात आले आहे, जो चित्रपटाच्या शूटिंगसाठी हरयाणात जातो आणि चुकून विकी नावाच्या मुलाचा खून करतो. यामध्ये जयदीप अहलावत नकारात्मक भूमिकेत दाखवण्यात आला असून तो विकीचा भाऊ आहे. मानव स्वतःला वाचवण्यासाठी परदेशात पळून जातो आणि विकीचा भाऊही तिथे पोहोचतो. या दोघांभोवती कथा फिरते.
३) रांगी (RAANGI)रांगी ही थाईयाल नायगी नावाच्या पत्रकाराची कहाणी आहे. यामध्ये एका कहाणीचे संशोधन करताना षडयंत्राबाबत समजते. याची कहाणी ए.आर. मुरुगादास यांनी लिहिली आहे, तर दिग्दर्शित एम. सरवणन यांनी केले आहे. हा महिलांवर बनलेला अॅक्शन थ्रिलर आहे. यामध्ये त्रिशा कृष्णन, अनस्वरा राजन आणि बेकझोद अब्दुमलिकोव्ह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ते २९ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे.
४) यू पीपल (YOU PEOPLE)यू पीपल नावाचा हा चित्रपट रोम-कॉम आहे. ज्यामध्ये एक तरुण जोडपे सामाजिक नियमांशी संघर्ष करत आहे. दोघांच्या कुटुंबात खूप फरक आहे, त्यामुळे चित्रपट आणखीनच मनोरंजक बनतो. कुटुंबांमधील मजेदार भांडण पाहणे खूप आनंददायक आहे. हा चित्रपट २७ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
५) एटीन पेजेस (18 PAGES)एटीन पेजेस हे एका कादंबरीवर आधारित आहे, ज्याचा अभिनेता सिद्धू आहे. तो एक सॉफ्टवेअर अभियंता आहे, ज्याला नंदिनी नावाच्या तरुणीचे पुस्तक सापडते. पुस्तक वाचल्यावर तो नंदिनीच्या प्रेमात पडतो आणि तिला शोधू लागतो. पलनाती सूर्य प्रताप दिग्दर्शित हा एक रोमँटिक कॉमेडी आहे. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन, पोसनी कृष्णा मुरली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे २७ जानेवारी रोजी AHA वर प्रसारित केले जाते.