Join us

मालिकांचेही यू ट्यूब कलेक्शन

By admin | Published: July 01, 2015 4:03 AM

‘मालिका’ आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तरुणाईमध्येही त्याची ‘क्रेझ’ आता वाढत आहे. जान्हवीचे काय होणार? ए तो कैवल्य, सुजय, आशू, यांची

‘मालिका’ आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तरुणाईमध्येही त्याची ‘क्रेझ’ आता वाढत आहे. जान्हवीचे काय होणार? ए तो कैवल्य, सुजय, आशू, यांची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ कसली भारी आहे ना!’ अशा गप्पांचे फड कट्ट्यावर रंगताना दिसत आहेत. मालिका पाहणाऱ्या या तरुणाईचा ‘टाइम क्लास’ जरा हटके आहे. टेक्नोसॅव्ही असलेल्या या मुलांचा फंडा काहीसा निराळा आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या जमान्यात दूरचित्रवाहिन्यांवर मालिका पाहायच्या ‘इट्स सो बोअरिंग’, असा काहीसा त्यांचा अ‍ॅटिट्यूड आहे. ‘होणार सून मी या घरची’ असो किंवा ‘कन्यादान’, ‘जय मल्हार’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिका पाहायच्या तर संध्याकाळचा क्लास आणि सकाळी पाहाव्यात तर कॉलेज. आपल्या वेळेत या मालिका पाहायच्या ‘यू-ट्यूब’च आहे मस्त! अगदी जुन्या मालिकाही अ‍ॅट इझी इथे पाहायला मिळतात, हे त्यातील विशेष! ‘अवघाची संसार’, ‘तू तिथे मी’ अशा मालिकांचे इंटरेस्टींग एपिसोडची मजाही ते लुटताना दिसत आहेत. एवढंच काय, पण ‘कुलवधू, तू तिथे मी, तुजविण सख्या रे, तू तिथे मी’ या मालिकांची टायटल साँगदेखील आजच्या मोबाईलमध्ये तर आहेतच; शिवाय पसंतीने रिंगटोन म्हणूनदेखील त्यांचे मोबाईल खणखणत आहेत. जुन्या मालिकांसोबत नवीन मालिकाही एन्जॉय करणारी ही जनरेशन आपल्या आवडीनुसार एपिसोड एन्जॉय करीत आहेत.