बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यावरून गायब आहेत. या अभिनेत्री आजही रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे ती म्हणजे बख्तावर खान म्हणजेच 'ओये ओये गर्ल' सोनम. या अभिनेत्रीने ९०च्या दशकात बोल्ड सीन देत खळबळ माजवली होती. मात्र गेल्या ३० वर्षांपासून ती रुपेरी पडद्यावरून गायब आहे. ही अभिनेत्री सध्या लाइमलाइटपासून दूर आहे.
नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर बोल्ड सीन देणे खूपच आव्हानात्मक होते. त्यामुळे बोल्ड सीन द्यायला अभिनेत्री पटकन तयार होत नसत. मात्र या काळात काही अभिनेत्री अशा होत्या ज्यांनी बिनधास्त बोल्ड सीन देत सर्वांना चकित केले होते. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सोनम. अभिनेत्री सोनमने 'मिट्टी और सोना' या चित्रपटात बोल्ड सीन देत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एक दोन नव्हे तर अनेक बोल्ड सीन देत खळबळ माजवली होती. इतकेच नाही तर या चित्रपटात अभिनेत्रीने काही न्यूड सीनही दिले होते. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती.