Join us

पद्मिनी कोल्हापुरेंना आजही 'या' गोष्टीचा होतोय पश्चाताप, त्या घटनेनंतर अभिनेत्री आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 07:00 IST

८० च्या दशकात पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत ही घटना घडली होती.

मराठमोळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासूनच अभिनयाच्या करकीर्दीला सुरुवात केली होती. प्रेम रोग, गहराई, सत्यम शिवम सुंदरम, जिंदगी, वो ७ दिन, सौतन, इन्साफ का तराजू अशा बऱ्याच हिट चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. ऋषी कपूर, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती या बॉलिवूडच्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

पद्मिनी कोल्हापुरे यांचा चिमणी पाखरं हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला. मंथन, प्रवास अशा काही मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. या व्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यात एक मोठी घटना देखील घडली ज्याची चर्चा देशभर झाली. इतकेच नाही तर ही बातमी चक्क ब्रिटनमध्येही पसरली होती. त्यामुळे पद्मिनी कोल्हापूरे खूपच प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. मात्र आजही त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे.  

८० च्या दशकात पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत घडली घटना८० च्या दशकात पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत ही घटना घडली होती. जेव्हा प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी चित्रपटाचे शूटिंग पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मुंबईतील एका स्टुडिओत त्यांना नेण्यात आले. या स्टुडिओत आहिस्ता आहिस्ता या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. पद्मिनी कोल्हापूरे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होत्या. प्रिन्स चार्ल्स तिथे आल्यावर अभिनेत्री शशिकला यांनी त्यांचे औक्षण केले होते. त्याचवेळी पद्मिनी कोल्हापूरे यांनी प्रिन्स चार्ल्सच्या गालावर किस केली होती. त्यांचे हे कृत्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वच चकीत झाले. कारण ८० च्या दशकात ही बाब साधारण समजली जात नव्हती. पद्मिनी यांच्या या कृत्याची देशभर तुफान चर्चा झाली.

ब्रिटनमध्ये असा आला अनुभव२०१३ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी ही बाब मीडियासमोर सांगितली होती. त्यांनी या घटनेबाबत असेही सांगितले की , जेव्हा या घटनेनंतर त्या काही कारणास्तव ब्रिटनमध्ये गेल्या होत्या त्यावेळी इमिग्रेशन ऑफिसरने त्यांना विचारले होते की, त्या तुम्हीच होत्या का ज्यांनी प्रिन्स चार्ल्स यांची किस घेतली होती?

टॅग्स :पद्मिनी कोल्हापुरे