Join us

 ‘बार्ड ऑफ ब्लड’मुळे पाकिस्तानी लष्कराचा जळफळाट; म्हणे, शाहरुख बॉलिवूड सिंड्रोमने ग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 11:15 AM

सध्या शाहरूख खान ‘बार्ड ऑफ  ब्लड’ या नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. नुकताच ‘बार्ड ऑफ ब्लड’चा ट्रेलर रिलीज झाला. लोकांना हा ट्रेलर प्रचंड आवडला. पण पाकिस्तानी लष्कराचा मात्र जळफळाट झाला.

ठळक मुद्दे‘बार्ड ऑफ ब्लड’ ’मध्ये इमरान हाश्मीने कबीर आनंद ही व्यक्तिरेखा साकारली आहे. कबीर आनंद हा भारतीय गुप्तचर खात्यात काम करणारा गुप्हेर असतो.

सध्या शाहरूख खान ‘बार्ड ऑफ  ब्लड’ या नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. ही वेबसीरिज शाहरुख प्रोड्यूस करतोय. इमरान हाश्मी व विनीत कुमार यात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. नुकताच ‘बार्ड ऑफ ब्लड’चा ट्रेलर रिलीज झाला. लोकांना हा ट्रेलर प्रचंड आवडला. पण पाकिस्तानी लष्कराचा मात्र जळफळाट झाला. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी यानिमित्ताने शाहरूख खानला लक्ष्य केले. शाहरूख बॉलिवूड सिंड्रोमने ग्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले.

गफूर यांनी यासंदर्भात एक ट्विट केले. ‘शाहरूख खान बॉलिवूड सिंड्रोमने ग्रस्त आहे. वास्तव जाणून घ्यायचे तर रॉचा गुप्तहेर कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि 27 फेबु्रवारी 2019 ची स्थिती बघ. हे असले उद्योग करण्याऐवजी भारतव्याप्त जम्मू काश्मीरात होत असलेला अन्याय, नाझीवादाप्रति आसक्त आरएसएसविरोधात भूमिका घेऊ शकतोस,’ असे गफूरने शाहरुखला उद्देशून  म्हटले आहे.

‘बार्ड ऑफ ब्लड’ ’मध्ये इमरान हाश्मीने कबीर आनंद ही व्यक्तिरेखा साकारली आहे. कबीर आनंद हा भारतीय गुप्तचर खात्यात काम करणारा गुप्हेर असतो. पाकिस्तानमध्ये भारताचे चार गुप्तहेर पकडले जातात. या चार गुप्तहेरांना सोडवण्यासाठी कबीर ऊर्फ एडोसिनला अन्य दोन व्यक्तींसह एका गुप्त मोहिमेवर पाठविण्यात येते. ही संपूर्ण मोहिमेची एक झलक ‘बार्ड ऑफ  ब्लड’ च्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आली आहे.येत्या 27 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. ऋभु दासगुप्ताने दिग्दर्शित केलेली ही वेबसीरिज लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या ‘बार्ड ऑफ  ब्लड’  या पुस्तकावर आधारित आहे.

टॅग्स :शाहरुख खाननेटफ्लिक्सपाकिस्तान