जबरदस्त पर्सनालिटी, शांत स्वभाव आणि प्रत्येकाशी आदराने बोलण्याची पद्धत यामुळे चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे फवाद खान (Fawad Khan). मूळचा पाकिस्तानी असलेल्या या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या पाकिस्तानी कलाकारांना बॅन केलं आहे. त्यामुळे फवाद कोणत्याही बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसत नाही. परंतु, पाकिस्तानी कलाकारांना बॅन करण्यापूर्वी फवादने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात दोन सिनेमा असे होते ज्यात त्याला अभिनेत्री सोनम कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत किसिंग सीन द्यायचा होता. परंतु, फवादने हा सीन देण्यास स्पष्टपणे नकार दिला.
फवादने 'खुबसूरत', 'कपूर अँड सन्स', 'ए दिल हैं मुश्किल' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात 'खुबसूरत' आणि 'कपूर अँड सन्स' या सिनेमात त्याला सोनम कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत किसिंग सीन द्यायचा होता. मात्र, त्याने नकार दिला. २०१७ मध्ये आलियाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने हा किस्सा शेअर केला.
"आमच्या सिनेमात फवादसोबत माझा एक किसिंग सीन होता. त्यावेळी आमचं असं ठरलं होतं की आम्ही चीट-किस करणार. पण जेव्हा मी हा सीन करण्यासाठी त्याच्या जवळ जायचे तो पटकन मागे सरकायचा. त्यामुळे मला त्याला खूप समजवालं लागलं", असं आलिया म्हणाली.
इतकंच नाही तर 'खूबसुरत'चं प्रमोशन करतानाही फवाद खानने किसिंग सीन न देण्यामागचं कारण सांगितलं होतं. "जे माझे खरे चाहते आहेत त्यांच्या भावनांचा आदर करणं माझं कर्तव्य आहे. जर अचानकपणे मी असे सीन करायला लागलो तर माझे प्रेक्षक नक्कीच माझ्यावर नाराज होतील. त्यामुळे मी किसिंग सीन वगैरे देत नाही," असं त्याने सांगितलं.
दरम्यान,फवादने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात ‘हमसफर’, ‘दास्तान’ ,‘जिंदगी गुलजार है’ या गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. 2007 मध्ये त्याने ‘खुदा के लिए’ या पाकिस्तानी सिनेमातून त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2014 मध्ये तो ‘खूबसूरत’ या सिनेमातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये झळखला.परंतु, त्यानंतर २०१६ मध्ये पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडने बॅन केलं. मात्र, बॅन होण्यापूर्वी त्याने २ बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं होतं.