भारत व पाकिस्तानात तणावाचे वातावरण असताना सोशल मीडियावरचे वातावरणही तापले आहे. भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दोन्ही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. त्यातच, भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत. अशात गायक अदनान सामीने एक ट्विट केले आणि या ट्विटने पाकिस्तानात जणू भूकंप आला.
‘अदनान, ज्या पाकिस्तानला तू आज शिव्या देत आहेस, त्याच पाकिस्तानात तू एकेकाळी राहायचा, हे कसे विसरलास. तुझे वडिल पाकिस्तान हवाई दलात वैमानिक होते. त्यांनी युद्ध लढले होते. त्या पित्याचा मुलगा आपल्या मातृभूमीला शिव्या कसा देऊ शकतो. तू दोन्ही देशांत शांतीदूत म्हणून काम करू शकतोय. पण तू असे केले नाहीस....,’अशी भलीमोठी पोस्ट अब्बासने लिहिली आहे. पाकिस्तानी नागरिकांनीही अदनानला ट्रोल करत, त्याला देशद्रोही म्हटले आहे. तुम्हाला ठाऊक असेलच की, अदनान सामी हा मुळचा पाकिस्तानी आहे. २०१५ मध्ये भारत सरकारने त्याला भारतीय नागरिकत्व बहाल केले होते.