अरमीना राणा खान ही प्रसिद्ध 'पाकिस्तानी' अभिनेत्री आहे. सध्या ती प्रेग्नंट असून हा काळ एंजॉय करत आहे. सोशल मीडियावर तिने काही प्रेग्नंसी शूटचे फोटो पोस्ट केले. हे काही पाकिस्तानी नागरिकांना पचलेले दिसत नाही. त्यांनी सोशल मीडियावरच अभिनेत्रीला खुप सुनावले. आता मात्र अरमीना ने सुद्धा ट्रोलर्स ला सडेतोड उत्तर दिले आहे. (Pakistani Actress Armeena Khan)
अरमीनाने आपल्या पतीसोबत पोज देत काही फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे. यावर पाकिस्तानी ट्रोलर्स नी मात्र तिला खुप सुनावले. असे फोटोशुट धर्माच्या विरोधात असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर अगदी गलिच्छ भाषेत तिच्यावर टीका केली. हॉलिवुडची कॉपी असे देखील म्हणले गेले.
महिलांवरील दबाव, बंधने हे आजही बंद झालेले दिसत नाही. पाकिस्तानात तर महिलांवर काय अत्याचार होत असतील याचा विचारही करवणार नाही. आजही अनेक गोष्टी या धर्माशी जोडल्या जातात याहुन दुर्दैवी ते काय असेल,