Join us

Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 16:34 IST

अभिनेत्री पलक सिंधवानीने मालिकेत सोनूची भूमिका साकारली.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतून आणखी एका कलाकाराने एक्झिट घेतली आहे. अभिनेत्री पलक सिंधवानीने (Palak Sindhwani)  मालिकेला रामराम केला आहे. पलकने मालिकेत  आत्माराम भिडेंची लेक 'सोनू'ची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला साहजिकच खूप लोकप्रियता मिळाली. मात्र आता तिने मालिका सोडली आहे. इतकंच नाही तर शो सोडत असल्याने तिला निर्मात्यांकडून मानसिक त्रास दिल्याचं नुकतंच ती म्हणाली होती. पलक सिंधवानीने निर्मात्यांवर अनेक आरोप केले होते.

पलक सिंधवानीने इन्स्टाग्रामवर काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. पाच वर्ष तिने मालिकेत काम केलं. दरम्यान या सर्व वर्षातील काही आठवणी तिने शेअर केल्या आहेत. इतर कलाकारांसोबतचे सुंदर क्षण तिने पोस्ट केले आहेत. ती लिहिते, "सेटवरचा शेवटचा दिवस. मागची पाच वर्ष ही मेहनत, सातत्य आणि चिकाटीने भरलेली होती. माझ्या सर्व प्रेक्षकांचे आभार. माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुमची आभारी आहे. हा प्रवास अद्भूत होता आणि अप्रतिम लोकांसोबत काम करता आलं याचा आनंद आहे. फक्त कलाकारांकडूनच नाही तर पडद्यामागे असलेल्या हेअरस्टाईलिस्ट, मेकअप टीम ते स्पॉट टीमपर्यंत सर्वांकडूनच मला शिकायला मिळालं. सोडताना नक्कीच डोळ्यात पाणी येत आहे आणि मी या आठवणी कायम साजऱ्या करेन."

ती पुढे लिहिते,"आयुष्यात पुढे जाण्याआधी मी हा वेळ स्वत:साठी देणार आहे आणि पुढच्या चॅप्टरसाठी सज्ज होणार आहे. एक अभिनेत्री म्हणून सेटवर आल्यावर सगळं सोडून चांगलं काम करण्याकडे लक्ष देणं हे महत्वाचं आहे आणि मी शेवटच्या शॉटपर्यंत तेच केलं. अखेर, आज रात्री ८.३० वाजता माझा बाप्पासोबतचा डान्स परफॉर्मन्स नक्की पाहा. गुडबाय!"

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया