Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश झा यांनी अनुराग कश्यपवर साधला निशाणा; 'गँग ऑफ वासेपूर'मधून बाहेर काढण्याविषयी म्हणाले 'जे राजकारण केलं जातं त्यांना..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 12:20 IST

Pankaj jha: 'गँग ऑफ वासेपूर' या सिनेमात पंकज त्रिपाठी यांनी साकारलेली सुल्तान कुरैशी ही भूमिका प्रथम पंकज झा यांना ऑफ झाली होती. परंतु, त्यांची निवड झाल्यानंतर अचानक त्यांना या सिनेमातून काढण्यात आलं .

सध्या सोशल मीडियावर पंचायत या वेब सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. या सीरिजच्या माध्यमातून अभिनेता पंकज झा (Pankaj jha) यांनी तुफान लोकप्रियता मिळवली. या सीरिजमधील त्यांचा अंदाज आणि त्यांनी वठवलेल्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. यात अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी थेट अनुराग कश्यपवर निशाणा साधला आहे. अनुराग कश्यपने मला गँग ऑफ वासेपूरमधून बाहेरचा रस्ता दाखवला असं पंकज झा यांनी म्हटलं आहे.

अनुराग कश्यप यांच्या करिअरमध्ये गँग ऑफ वासेपूरचा मोठा वाटा आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमात मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी, पंकज त्रिपाठी, तिग्मांशू धुलिया, राजकुमार राव यांसारखे अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये पंकज झा ची देखील वर्णी लागली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याविषयी त्यांनी स्वत: खुलासा केला आहे.

'गँग ऑफ वासेपूर' या सिनेमात पंकज त्रिपाठी यांनी साकारलेली सुल्तान कुरैशी ही भूमिका प्रथम पंकज झा यांना ऑफ झाली होती. परंतु, त्यांची निवड झाल्यानंतर अचानक त्यांना या सिनेमातून काढण्यात आलं आणि त्यांच्या जागी पंकज त्रिपाठी यांना कास्ट करण्यात आलं.

"माझ्या पाठीमागून जे राजकारण केलं जातं त्याला काहीच अर्थ नाही. कारण, या सगळ्यांचा तेव्हाच विजय होईल जेव्हा या गोष्टींचा मला त्रास होईल किंवा माझं एखादं नुकसान होईल. जे लोक इतरांच्या पाठीमागून राजकारण करतात ते खरंतर भित्रट असतात. नाही तर ते कधीच समोर येऊन बोलले असते", असं पंकज झा म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "जर सत्या आणि गुलाल सारखे सिनेमा जर कलाकार करु शकतात तर ते डारेक्टर्सलाही नक्कीच तयार करु शकतात. पण इथे इतके घाबरट आणि आधारहीन लोक आहेत जे स्वत:चं मतही मांडू शकत नाही. नंतर मला कळलं की डायरेक्टरची अवस्था सुद्धा वाईटच होती. त्यालाच कुठे काम मिळत नव्हतं आणि तो याच प्रोजेक्टवर ३६ वेगवेगळी काम करत होता."

टॅग्स :बॉलिवूडपंकज त्रिपाठीअनुराग कश्यपसिनेमासेलिब्रिटी