Join us

'पंचायत'मधील 'विधायक'चा पंकज त्रिपाठींवर हल्लाबोल? म्हणाला - "तुम्ही त्यांना आदर दिला नाही तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 1:45 PM

'पंचायत' या गाजलेल्या वेबसिरीजमधील विधायकने पंकज त्रिपाठींवर निशाणा साधत मोठा खुलासा केलाय (panchayat 3, pankaj jha, pankaj tripathi)

सध्या सर्वांना उत्सुकता आहे 'पंचायत 3' या वेबसिरीजची. पंचायतच्या दोन्ही सीझनमध्ये आमदार चंद्र किशोर म्हणजेच विधायकजींची भूमिका साकारणाऱ्या पंकज झा यांनी अभिनेता पंकज त्रिपाठीवर निशाणा साधला आहे. पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या काळाला खूप ग्लोरीफाय केलं असा आरोप गौरव यांनी केलाय. याशिवाय 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील सुलतानच्या भूमिकेसाठी आपण पहिली पसंती असल्याचा दावाही पंकज झा यांनी केला आहे. पण कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी त्यांच्या जागी पंकज त्रिपाठीला साइन केले, असा खुलासा त्यांनी केलाय.

'पंचायत'मधील विधायक म्हणजेच अभिनेते पंकज झा यांनी 'ललनटॉप सिनेमा'ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठींवर नाव न घेता निशाणा साधलाय. त्यांनी सांगितलं की. त्यांना 'स्ट्रगल' हा शब्द मला अजिबात आवडत नाही. जर तुम्ही तुमच्या आवडीचं काम करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही त्याचा आनंद घ्यावा. बरोबर की नाही? अनेकदा चित्रपटसृष्टीत लोकांना त्यांच्या संघर्षांच्या दिवसांना ग्लॅमराइज करायला आवडते. काही लोकं म्हणतात की त्यांनी बटाटे विकले. काहीजण म्हणतात की ते एका छोट्या घरात राहत होते. काहींचे म्हणणे आहे की त्याने दुसऱ्या अभिनेत्याची चप्पल चोरली. मला वाटते की प्रत्येक परिस्थिती हा शिकण्याचा अनुभव असतो.

पंकज झा पुढे म्हणाले, "या लोकांना एक कॉम्प्लेक्स आहे. जर तुम्ही त्यांना आदर दिला नाही किंवा तुमचं मत मांडलं तर ते नाराज होतात. ते इतके दुःखी होतात की ते पुन्हा तुमच्यासोबत काम करण्यास नकार देतात. इतकंच नव्हे त्यांच्या मित्रांनाही तुमच्यासोबत काम करू नका असे सांगतात. हे माझ्या बाबतीत घडले आहे."

पंकज यांनी पुढे खुलासा केला की, "मी 'गॅग्स ऑफ वासेपूर' करणार होतो आणि मला मुकेश छाबरा यांचा फोन आला. मी तेव्हा पाटण्यात होतो म्हणून काही दिवसांनी परतलो. तोपर्यंत त्यांनी मला जे पात्र साकारायचे होते ते करण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी बोलावले. ती सुलतानची भूमिका होती. नंतर मात्र मला त्या प्रोडक्शन हाऊसचा फोन आला नाही." 'गँग्ज ऑफ वासेपूर'मधील सुलतानची भूमिका साकारुन पंकज त्रिपाठी रातोरात स्टार झाले.

टॅग्स :पंकज त्रिपाठीपंचायत समिती