Join us

अन् तो सिनेमा ठरला रवींद्र महाजनी यांचा शेवटचा, वडील-मुलाच्या जोडीनं केलं होतं एकत्र काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 1:48 PM

वडील आणि मुलाच्या जोडीनं बॉलिवूडच्या एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा रवींद्र महाजनी यांचा शेवटचा सिनेमा ठरला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ  अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘देवता’, ‘आराम हराम आहे’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘बेलभंडार’ अशा सुपरहिट सिनेमांत काम करुन रवींद्र महाजनी यांनी ७० ते ९०चा काळ गाजवला. त्यांनी फार कमी चित्रपटात काम केले पण तरीदेखील आजही प्रेक्षकांच्या मनात त्यांचं स्थान कायम आहे. 

त्यांच्या मुलगा गश्मीर महाजनीही लोकप्रिय अभिनेता आहे. वडील आणि मुलाच्या जोडीनं बॉलिवूडच्या एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा रवींद्र महाजनी यांचा शेवटचा सिनेमा ठरला आहे.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपट पानिपतमध्ये रवींद्र महाजनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात त्यांनी मल्हार राव होळकरांची भूमिका साकारली होती. याच सिनेमात गश्मीर महाजनीदेखील काम केलं होते. आहे. तो जंकोजी शिंदेंच्या भूमिकेत दिसला होता. सिनेमातील दोघांचाही लूक उत्कृष्ट असा होता. या सिनेमाच्या निमित्ताने वडील आणि मुलाच्या जोडीला एकत्र काम करता आलं होतं. 

 रवींद्र महाजनी यांना मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून  खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली.  शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला.

यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’,  ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे चित्रपटही गाजले. तसेच ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे प्रयोग केले. सन १९९० नंतर  चरित्र भूमिकां, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आणि ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. २०१५ नंतर त्यांनी 'काय राव तुम्ही', 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'पानीपत' अशा काही चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या.

 

टॅग्स :रवींद्र महाजनीगश्मिर महाजनी