अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे ‘गँग्स ऑफ वासेपुर’ ते ‘मिर्जापूर‘ पर्यंत पंकज यांना आपल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. अभिनेता बनण्यासाठी पंकज यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली.
सुरुवातीच्या दिवसांत कामाची संधी मिळत नसताना ब-याच अडचणींचा सामना करावा लागला. मायानगरी मुंबईत काम मिळवण्यासाठी सातत्याने चकरा मारायचे, जितके स्टुडिओ आहेत त्या स्टुडिओ बाहेर तासन तास कोणची तरी भेट होईल काम मिळेल यासाठी वाट बघायचे. आज ''बस नाम ही काफी है'' नावावरच सिनेमा मिळतात. इतक्या सिनेमांच्या ऑफर्स त्यांना मिळतात.
स्ट्रगल काळ कुणालाच चुकला नाही... मग या पंकज त्रिपाठी यांना तरी तो कसा चुकणार.... आज यशाच्या शिखरावर असतानाही त्याच स्ट्रगल पिरीयडच्या आठवणी आजही त्यांच्या मनात घर करुन आहेत. ध्येय गाठण्यासाठी कितीही मोठ्या समस्या आल्या तरी हार मानली नाही. संघर्ष करत राहिले. त्यांच्या या संघर्षात पत्नीनेही त्यांना साथ दिली.पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्यांचा विश्वास कधीही ढळू दिला नाही. इतकंच काय तर सुरुवातीच्या काळात एकाच खोलीत पंकज त्रिपाठी यांचे कुटुंबाला रहावे लागत होते. उदरनिर्वाहासाठीही पुरेसे पैसे पंकज यांच्याकडे नसायचे. अशावेळी पत्नीच्या येणा-या पगारातून त्यांच्या संसाराचा गाडा चालायचा. छोट्याशा घरात गुजराण केली असली तरी आज तिच छोटीशी खोली कोणत्याही महलापेक्षा कमी नसल्याचे पंकज त्रिपाठी सांगतात. जसं जसं काम मिळत गेले आणि कमाईही वाढत गेली. तसतसे पंकज यांचेही कुटुंबासाठी पाहिलेले सगळे स्वप्न पूर्ण होत गेले.
मुंबईत आपले सुद्धा हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची ईच्छा असते. प्रत्येकजण त्यासाठी हवी तितकी मेहनत करत असतो. हेच स्वप्न पंकज यांनीही पाहिले होते. आज मड आईलैंडमध्ये आलिशान फ्लॅटमध्ये पंकज त्रिपाठी आपल्या कुटुंबासोबत राहतात. हा फ्लॅट पहिल्यांदा पंकज यांनी पत्नीला दाखवला तेव्हा पत्नीचे अश्रु अनावर झाले होते.
कुटुंबासाठी इतका मोठा फ्लॅट घेण्याचे पंकज यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. याचे एक वेगळेच समाधान आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील असेच आहे. पंकज त्रिपाठी आज एका सिनेमासाठी २५ ते १ कोटी इतके रुपये मानधन घेतात. सिनेमाच नाही तर जाहिरातीदेखील त्यांच्या कमाईचे साधन आहे. कुटुंबासोबत आज पंकज त्रिपाठी आलिशान आयुष्य जगत आहेत.