Join us

'पप्पी दे पारुला' फेम स्मिता गोंदकरचा आणखी एक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:13 PM

अभिनेत्री स्मिता गोंदकरनं आतापर्यंत काही म्युझिक व्हिडिओ केले आहेत. 'पप्पी दे पारुला' स्मिताचे गाणे तर सुपरहिट ठरले.

दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या स्मिताने आता पुन्हा एकदा रसिकांच्या मनोरंजनासाठी नवीन अल्बम रसिकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज जाली आहे. 'साजणी तू क्षण मोहरणारा, साजणी तू चांद राती तारा' अशी उत्तम रचना असलेल्या साजणी तू या म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर झळकणार आहे. आदित्य बर्वेनं या म्युझिक व्हिडिओचं संगीत आणि दिग्दर्शन केलं आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे.

सप्तसूर म्युझिक प्रस्तुत "साजणी तू...." या म्युझिक व्हिडिओची निर्मिती व्हीबी फिल्म्स आणि सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अंबरीश देशपांडेनं लिहिलेलं हे गाणं ऋषिकेश रानडेनं गायलं आहे. अशोक पवार या म्युझिस व्हिडिओचे छायालेखक आहेत. रोहन गोगटे, अजित नेगी यांनी संकलन केलं आहे. 'साजणी तू'द्वारे एक फ्रेश म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री स्मिता गोंदकरनं आतापर्यंत काही म्युझिक व्हिडिओ केले आहेत. 'पप्पी दे पारुला' स्मिताचे गाणे तर सुपरहिट ठरले. आजही गाणे वाजताच स्मिता रसिकांना स्मिता नाही आठवली तर नवलच. हा अल्बमही सा-यांची पसंतीस पात्र ठरला होता.  स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. मात्र बऱ्याच काळानंतर स्मिता पुन्हा एकदा साजणी तू या म्युझिक व्हिडिओद्वारे या माध्यमाकडे परतली आहे. उत्तम शब्द, श्रवणीय संगीत, देखणं छायाचित्रण असा योग या म्युझिक व्हिडिओमध्ये जुळून आला आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकच्या  म्युझिक व्हिडिओंना आतापर्यंत मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता 'साजणी तू' सुद्धा प्रेक्षकांची दाद मिळवणार यात शंकाच नाही.

सिनेमासोबतच आपल्या ग्लॅमरस लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे स्मिताचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

टॅग्स :स्मिता गोंदकर