Join us

लग्नापूर्वी प्रेग्नंट राहिलेल्या महिमा चौधरीचा मोडला दोनदा संसार; आता जगतीये एकाकी जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 13:51 IST

Mahima chaudhry: महिमाने टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत याच्यासोबत पहिला संसार थाटला होता. परंतु, त्यांचा संसार जेमतेम ३ वर्ष टिकला.

घर, संसार आणि मुलंबाळं यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच एक स्त्री स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठीही बरीच मेहनत करत असते. त्यामुळे एक प्रकारे तिची तारेवरची कसरतच होत असते. अशाही परिस्थितीमध्ये जर तिच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं तर ती बऱ्याचदा कोलमडून पडते. सध्या अशीच काहीशी परिस्थिती 'परदेस'फेम अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry)  हिची झाली आहे.

'परदेस' (pardes ) या चित्रपटातून विशेष लोकप्रिय झालेल्या महिमाने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली. परंतु, करिअरचा आलेख उंचावत असताना तिच्या वैवाहिक जीवनात अनेक चढउतार येत होते. यात दोन वेळा तिचा संसार मोडला. त्यामुळे सध्या ती एकाकी जीवन जगत असल्याचं सांगण्यात येतं.

टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत थाटला पहिला संसार

महिमाने टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत याच्यासोबत पहिला संसार थाटला होता. परंतु, त्यांचा संसार जेमतेम ३ वर्ष टिकला. २००३ मध्ये लिएंडर पेस आणि मॉडल रिया पिल्लई यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. त्यावेळी रिया अभिनेता संजय दत्तची पत्नी होती. विशेष म्हणजे महिमाने लिएंडर आणि रिया यांना एकत्र रंगेहात पकडलं. त्यानंतर तिने लिएंडरपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

भावाच्या मित्रासोबत केलं दुसरं लग्न

२००६ साली महिमाने कोलकातामध्ये राहणारा ऑर्किटेक्ट बॉबी मुखर्जी याच्यासोबत लग्न केलं. बॉबी, महिमाच्या भावाचा मित्र होता त्यामुळे बऱ्याचदा त्या दोघांची भेट व्हायची.  या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि १९ मार्च २००६ मध्ये त्यांनी गुपचूपपणे लग्न केलं. विशेष म्हणजे लग्नानंतर महिमाचं बेबीबंप दिसायला लागल्यामुळे तिला बॉबीसोबतच्या लग्नाविषयी सांगावं लागलं. परंतु, महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्यामुळे तिने घाईघाईत लग्न उरकलं असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे बॉबीसोबतही तिचं नातं फार टिकलं नाही.

एकटी राहतीये महिमा

२००७ मध्ये महिमाने एका मुलीला जन्म दिला. मात्र, तिच्या जन्मापूर्वीच बॉबी आणि महिमाच्या नात्यात दुरावा आला होता. बॉबी आणि त्याच्या एक्स पत्नीची कायदेशीर लढाई सुरु झाल्यामुळे बॉबी आणि महिमाच्या नात्यातही दुरावा आला. २०१३ मध्ये ही जोडी वेगळी झाली. या दोघांनीही घटस्फोट घेतला नाही. परंतु, ते एकत्रही राहात नाहीत. 

टॅग्स :महिमा चौधरीलिएंडर पेससंजय दत्तबॉलिवूडसेलिब्रिटी