Join us

Aryan khan drugs case: 'वडिलांचं नाव खराब ...'; aryan khan प्रकरणी परेश रावल व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 12:30 PM

Aryan khan drugs case: २ ऑक्टोबर रोजी आर्यनला कॉर्डेलिया क्रूझवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हापासून त्याच्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या प्रकरणी त्यांची मत मांडली आहेत.

बॉलिवूड अभिनेता (bollywood actor) शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) याला नुकतीच क्रूझ ड्रग्ज पार्टी (drugs party)प्रकरणी जामीन मिळाला आहे. तब्बल २७ दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामीन मिळाला असून अद्यापही त्याच्याविषयीच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. २ ऑक्टोबर रोजी आर्यनला कॉर्डेलिया क्रूझवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हापासून त्याच्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या प्रकरणी त्यांची मत मांडली आहेत. यामध्येच अभिनेता परेश रावल (paresh rawal ) यांची एक मुलाखत चर्चेत आली आहे.  आर्यन खान प्रकरणी ते व्यक्त झाले असून वडिलांचं नाव खराब होणार नाही याची काळजी मुलांनी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल आर्यन खान प्रकरणी व्यक्त झाले आहेत. "सध्या आर्यन खानसोबत जे घडतंय ते पाहून तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती किंवा चिंता वाटते का? कारण तुम्ही देखील दोन मुले वडील आहात", असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर परेश रावल यांनी मत मांडलं आहे. 

मन्नत नव्हे 'हे' आहे शाहरुखच्या बंगल्याचं खरं नाव; किंमत ऐकून व्हाल हैराण

"एक वडील म्हणून तुम्ही तुमची सगळी कर्तव्य पार पाडत असता. पण, तुम्ही तुमच्या मुलांचं आयुष्य कंट्रोल करु शकत नाहीत. मुलं तरुण होत असतात. त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं असतं. तुम्ही दरवेळी त्यांच्या मागे-मागे जाऊ शकत नाही किंवा कुठे जाताय, काय करताय असा जाबही विचारु शकत नाही.  त्यांना त्यांचा विचार करायचा असतो.  तुम्ही त्यांच्यावर चांगलेच संस्कार करत असता. पण, जर मुलांनी घराबाहेर जाऊन काही चुकीचं कृत्य केलं तर तुम्ही काय करणार? त्यामुळे मला असं वाटतं की, मुलांनी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा", असं परेश रावल म्हणाले.

परेश रावल यांची पत्नीदेखील आहे दिसायला सुंदर; पाहा त्यांचे फोटो

पुढे ते म्हणतात, "आपल्यामुळे आपल्या वडिलांचं नाव खराब होणार नाही ना याची काळजी मुलांनी घेतली पाहिजे. कारण, वडिलांनी मेहनत घेऊन स्वत:ची ओळख निर्माण केली असतं."

दरम्यान, आर्यन खान प्रकरणी अनेक सेलिब्रिटींनी त्यांची मत मांडली आहेत. अनेकांनी आर्यन व शाहरुखला पाठिंबा दिला आहे. तर, काहींनी टीकास्त्रदेखील डागलं आहे. 

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीआर्यन खानपरेश रावलशाहरुख खान