Join us

शाहिद कपूरसोबत बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला काम करायचंय; पण एका अटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 11:43 IST

आता बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री शाहिदसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा. अलीकडेच चाहत्यांसोबत चॅटिंग करताना तिने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि शाहिदसोबत काम करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली.

कबीर सिंग’ चित्रपटामुळे सध्या अभिनेता शाहिद कपूरची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. कबीर सिंग हा चित्रपट शाहिदच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट  म्हणायला हरकत नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान कमाई करत आहे. शाहिदला मिळालेली कियाराच्या उत्कृष्ट अभिनयाची साथ आणि उत्तम स्क्रिप्ट यामुळे चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी झाली आहे. आता बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री शाहिदसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा. अलीकडेच चाहत्यांसोबत चॅटिंग करताना तिने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि शाहिदसोबत काम करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. पण ते ही एका अटीवर. ते म्हणजे आम्हाला जर एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्कीच त्याच्यासोबत काम करेन.

अभिनेत्री परिणीती चोप्रा ही एक गुणी अभिनेत्री असून ती तिला मिळालेल्या भूमिका अतिशय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करते. ती सध्या सायना नेहवाल हिच्या बायोपिक चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतल्याचे समजतेय. या चित्रपटासाठी ती ट्रेनिंग देखील घेताना दिसत आहे. सध्या चर्चेत असलेले ‘बॉटल कॅप चॅलेंज’ तिने बॅडमिंटन कोर्टवरच पूर्ण केले. यादरम्यान तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची तिने समाधानकारक उत्तरे दिली. पण, हे देखील मान्य केले की, सायनासारख्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करणं काही सोप्पं काम नाही. मात्र, तरीही ती प्रचंड मेहनत घेत आहे. 

परिणीतीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, हॉलिवूड चित्रपटशिवाय ती  ‘सायना नेहवाल बायोपिक’ आणि ‘जबरिया जोडी’ या चित्रपटांच्या बाबतीत ती खूप मेहनत घेत आहे. अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा तिचा ‘जबरिया जोडी’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्याशिवाय हॉलिवूडमधील एका चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठीही तिचे नाव पुढे आले आहे. हा चित्रपट  २०१५च्या बेस्ट सेलर एका पुस्तकावर आधारित आहे.

टॅग्स :परिणीती चोप्राकबीर सिंगशाहिद कपूर