Join us

परिणीती चोप्रा सांगते, डिप्रेशनमुळे स्वतःला घरात घेतले होते कोंडून, वाचा काय होते हे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 6:13 PM

2014 आणि 2025 या काळात परिणीतीच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टींमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती असे तिने एका कार्यक्रमात कबूल केले.

ठळक मुद्देमाझे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. मी याआधीच एक घर घेतले होते आणि काही इन्व्हेस्टमेंट्स देखील केले होते. त्यामुळे माझ्याकडे त्यावेळी अजिबातच पैसे नव्हते. या सगळ्या टेन्शनमध्ये असताना माझे ब्रेकअप झाले.

परिणीती चोप्रा लवकरच जबरिया जोडी चित्रपटात झळकणार आहे आणि सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने टेपकास्ट या टॉक शोमध्ये तिने हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळाविषयी सांगितले. ती 2014 आणि 2025 या काळात तिच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती असे तिने या कार्यक्रमात कबूल केले.

परिणीतीने या मुलाखतीत सांगितले की, 2014 चा शेवट आणि 2015 हे वर्षं... म्हणजे जवळजवळ दीड वर्षं तरी माझ्या आयुष्यात खूपच वाईट गेले. माझे दावत-ए-इश्क आणि किल्ल दिल हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. मी याआधीच एक घर घेतले होते आणि काही इन्व्हेस्टमेंट्स देखील केले होते. त्यामुळे माझ्याकडे त्यावेळी अजिबातच पैसे नव्हते. या सगळ्या टेन्शनमध्ये असताना माझे ब्रेकअप झाले. त्यामुळे माझ्या आयुष्यात कोणतीच चांगली गोष्ट घडत नाहीये असेच मला वाटत होते. 

मी खायचे सोडले होते. तसेच मला रात्री झोप यायची नाही. मला लोकांमध्ये मिसळायला आवडायचे नाही. मी माझ्या कुटुंबियांच्या देखील संपर्कात नव्हते. मी दोन आठवड्यातून एकदा त्यांच्याशी बोलायचे. मी घरात बसून केवळ टिव्ही पाहायचे. एखाद्या आजारी व्यक्तीप्रमाणे पडून राहायचे आणि केवळ रडायचे. मी मीडियापासून देखील स्वतःला दूर ठेवले होते. 

याविषयी पुढे परिणिती सांगते, या सगळ्या माझ्या डिप्रेशनमध्ये मला माझ्या भावाने प्रचंड मदत केली. माझा भाऊ सहेजशी मी दिवसातून एकदा तरी बोलायचे. तसेच माझी मैत्रीण संजनासोबत मी माझ्या आयुष्यात सुरू असलेल्या सगळ्या गोष्टी शेअर करायची. या दोघांमुळे मला या सगळ्यातून बाहेर पडता आले. 2016 पर्यंच मी या सगळ्यातून बाहेर आली होती. मी गोलमाल आणि मेरी प्यारी बिंदू हे दोन चित्रपट देखील साईन केले. नवीन घरात राहायला गेले. हळूहळू माझे आयुष्य पूर्वपदावर आले. 

टॅग्स :परिणीती चोप्रासिद्धार्थ मल्होत्रा