आपला प्रामाणिकपणा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर स्टार प्लसवरील ‘कसौटी झिंदगी के’मधील अनुराग बसू प्रेक्षकांची मने जिंकत आहे. तो एक आदर्श मुलगा असून मालिकेत त्याचे त्याची आई मोहिनी हिच्याशी असलेले नाते सर्वच तरुणींना हृदयस्पर्शी वाटते. पण वास्तव जीवनातही अनुराग म्हणजेच अभिनेता पार्थ समथान हा आईवेडा, आईचा एक आज्ञाधारक मुलगा आहे.
प्रत्येक मुलीला आपल्या स्वप्नातील आदर्श पुरुष असाच असावा, हे केवळ अनुराग बसूनेच नव्हे, तर पार्थ समथाननेही वारंवार दाखवून दिले आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’मधील अनुराग बसू ही व्यक्तिरेखा पार्थने जिवंत केली असून त्या भूमिकेला त्याने पुरेपूर न्याय दिला आहे, असे सर्वच समीक्षकांचे मत बनले आहे.