- भक्ती सोमणथंडीच्या दिवसात आपल्याला ताजी फळे-भाज्या मिळतात. यातल्या विशिष्ट गोष्टी एकत्र करून ज्यूस, मॉकटेल, स्मूदी, मिल्कशेक्स अशी विविध पेय करता येऊ शकतात. थोडी कल्पकता लढवून हे ड्रींक्स पार्टीसाठीही होऊ शकतात.थंडीचे दिवस सुरू झाले की वातावरणातही उत्साह संचारतो. वेगवेगळे डेज, ख्रिसमस, नववर्षाची तयारी असे काहीना काही सुरूच असते. मस्त पार्टीचा माहोल असतो. अस्सल खवय्यांसाठी ती पर्वणीच असते. ताज्या भाज्या, फळे यांची रेलचेल याच कालावधीत पाहायला मिळते. म्हणून तर किती आणि काय काय पदार्थ करायचे असे होऊन जाते. पिण्याचेही विविध प्रकार करता येतात. हेल्दी लोकांना हेल्दी प्रकार तर आहेतच; पण इतरही विविध पेये पिता येतात.पदार्थांबरोबर विविध पेयेही या काळात करता येतात. भाज्यांबाबतीत बोलायचे झाल्यास काकडी, गाजर, बीट, टॉमेटो, पालक, पुदीना अशा भाज्या अगदी फ्रेश मिळतात. तर स्ट्रोबेरी, सीताफळ, पपई, ब्लूबेरी, सफरचंद अशी फळेही असतात. एकतर यांचे स्वतंत्र ज्युस तर होतातच; पण आता फळं आणि भाज्या मिक्स करून ज्युस पिण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यात सफरचंद, पालक किंवा दुधी-गाजर, गाजर-बीट असे एकसोएक प्रकार करता येऊ शकतात.आरोग्याच्या दृष्टीने हे ज्युस पौष्टिक असल्याने ते प्यायचा सल्ला आहारतज्ज्ञही देतात. जर गाजर, टॉमेटो, बीटचे ज्युस करायचे असेल तर आवडीप्रमाणे ते एकत्र करून त्यात चवीप्रमाणे आलं, लिंबाचा रस, मीरपूड, मीठ आणि बर्फ घालून मिस्करमधून फिरवून घ्यायचं आणि छानशा ग्लासमध्ये वर पुदीना घालून प्यायला द्यायचं. असा प्रकार कोबीच्या बाबतीतही करता येतो. जरा गूगल सर्च केलंत तर अशा प्रकारच्या ज्युसेसचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. तसेच फक्त काकडी किंवा बीट वापरून त्यात आवडीप्रमाणे दही, काजू, थोडीशी मिरची वगैरे घालून त्याची स्मूदी करता येते.या काळात मिळणाºया आंबट-गोड स्ट्रोबेरीची मजा काही औरच असते. स्ट्रोबेरी फ्रिकशेकविषयी याआधीही सांगितलेच आहे. पण नुसती स्ट्रोबेरी, दूध, क्रीम, साखर घालून मिल्कशेक करता येतो. थोडी तिखट चव हवी असेल तर स्ट्रोबेरीत थोडीशी मिरची, दही घालून स्मूदीही करता येऊ शकते. केळे, स्ट्रोबेरी, काजू आणि दही घालूनसुद्धा स्मूदी करता येऊ शकेल. याशिवाय पपई, सीताफळ, अननस, कलिंगड अशी या कालावधीत येणारी फळे वापरता येतील. अननसाचा ज्युस, स्ट्रोबेरी, आल्याचा रस, लिंबाचा रस एकत्र करून ‘पायनापल स्ट्रोबेरी पंच’ होते. कलिंगडाचा ज्युस तर हमखास पितोच आपण. असे विविध पर्याय करता येऊ शकतात. मग काय विविध ड्रिंक्स ट्राय करून या थंडीची मजा घ्या.प्या पंच...या काळात या काळात अनेक ठिकाणी पार्ट्या रंगतात. त्या वेळी हार्ड ड्रिंक असतंच. पण मग न पिणाºया लोकांना कॉल्ड ड्रिंकवर समाधान मानावं लागतं. हार्ड ड्रिंक वा कॉकटेलशी साधर्म्य साधणारी पेये आजकाल असतातच. त्यात प्रामुख्याने विविध फळांचे रस, लिंबू, पुदिन्याची पाने एकत्र केलेल्या मॉकटेल्सना प्राधान्य दिले जाते. याशिवाय सध्या विविध फळांच्या रसापासून तयार होणारे ‘पंच ड्रिंक’ पार्टीसाठी चांगला पर्याय आहे. अननस ज्युस, संत्र्याचा ज्युस, लिंबाचा रस, आल्याचा किस आणि बर्फ एकत्र करून पायनापल पंच, तर संत्र्याचा ज्युस, लिंबू, डाळिंबाचे दाणे, बर्फ यांचेही पंच होते. रासबेरी लॅमोनेडमध्ये पाणी, अननसाचा ज्युस, लाइम सोडा एकत्र केलेले ‘पिंक पंच’, स्ट्रोबेरी, पीच, आल्याचा रस, पाणी यांचा पंच अशी काही पेये सध्या लोकप्रिय आहेत.
पार्टी तो बनती है...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 2:18 AM