सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रासुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनय, अदा आणि सौंदर्यसोबतच तिच्याविषयीची छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो.
प्रियंकाचा ( Priyanka Chopra) भारतातच नाही तर भारताबाहेरही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. जगभरात तिचे फॅन्स आहेत.प्रियंका लग्नाआधीच हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होती. प्रियंका अनेकदा बोल्ड फॅशनमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटोसुद्धा व्हायरल होत असतात. अनेकदा फोटोंमुळे तिला ट्रोलही केले जाते. प्रियंका आज आलिशान आयुष्य जगते. तिच्या राहण्यावरुन तिच्या लक्झरियस लाईफस्टाईलचा अंदाजही तुम्हाला येईल.
प्रियंका तिच्या फिल्मी करिअरमुळे कमी मात्र खासगी गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असते.अनेकदा तिचे जुने किस्सेसुद्धा सतत चर्चेत असतात. असाच तिचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे.अमेरिकन शो क्वान्टिको करत असताना प्रियंकाबरोबर हा किस्सा घडला होता.याशोमुळे प्रियंका खूप प्रसिद्ध झाली होती. तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.त्याच दरम्यानचा हा किस्का आहे.फ्लाईमध्ये प्रियंकाने चक्क दारुची मागणी केली. दारुच्या नशेत ती धुंद झाली होती. त्यानंतर तिने तिथेच उल्टीसुद्धा केली. वाचून अनेकांना आश्चर्यच वाटेल. पण हा किस्सा खरोखरंच घडला होता. तिच्या सगळ्या हरकती या लहान मुलांप्रमाणेच होत्या. तिचे वागणं बघून प्रवासीसुद्धा हसून हसून लोटपोट होत होते. अनेकदा सेलिब्रेटी सार्वजनिक ठिकाणी कधी काय वागतील सांगता येत नाही त्यातलाच हा प्रकार होता. प्रियंका ज्या फ्लाईमध्ये होती तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने प्रियंकाचा हा किस्सा सांगितला होता. याचा व्हिडीओसुद्धा काहींनी बनवला होता. तो सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला होता. मात्र नंतर तो डिलीट करण्यात आला होता.
प्रियांका चोप्राने डिसेंबर २०१८ मध्ये अमेरिकन पॉप सिंगर निक जोनाससोबत (Nick Jonas)लग्न केले होते . दोघांचे लग्न जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पार पडले. लग्नानंतर या कपलने तीन वेगवेगळे रिसेप्शन दिले होते, ज्यामध्ये बॉलिवूड, उद्योग आणि राजकीय दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले होते.