Join us

आशियाई चित्रपट महोत्सवात ‘परतु’ची बाजी

By admin | Published: October 07, 2015 4:40 AM

वेगळ्या धाटणीच्या सत्यकथेवर आधारित आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या हॉलीवूडच्या ‘ईस्ट वेस्ट फिल्म्स’ या नामांकित कंपनीच्या ‘परतु’ या मराठी चित्रपटाने

वेगळ्या धाटणीच्या सत्यकथेवर आधारित आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या हॉलीवूडच्या ‘ईस्ट वेस्ट फिल्म्स’ या नामांकित कंपनीच्या ‘परतु’ या मराठी चित्रपटाने वॉशिंग्टनमधल्या चौथ्या डीसी साऊथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये मानाच्या पुरस्कारांमध्ये आपली मोहोर उमटवली. महोत्सवामध्ये नितीन अडसूळ दिग्दर्शित ‘परतु’चीच धूम पाहायला मिळाली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता (किशोर कदम) आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळविले. दिग्दर्शक म्हणून माझ्या चित्रपटाला एवढा मोठा बहुमान मिळावा, यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही. आपल्या मराठमोळ्या चित्रपट संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्शन घडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आशियाई चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांचा आभारी आहे. ‘परतु’ या चित्रपटाचे यश हे सर्व ‘टीम’चे असल्याची भावना अभिनेता किशोर कदम व नितीन अडसूळ यांनी व्यक्त केली. या चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवादलेखन मयूर देवल यांनी केले आहे. संकलनाची जबाबदारी राजेश राव यांनी सांभाळली आहे. सत्यकथेवर आधारित असलेल्या ‘परतु’ चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा कथाविषय यानिमित्ताने पाहता येणार आहे.