Join us

Amazon'ने मारली बाजी! पठाणचे OTT हक्क इतक्या कोटींना विकले, लवकरच रिलीज होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 12:07 PM

बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानने तब्बल ५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुखचा नवा चित्रपट 'पठाण' दररोज कमाईचे विक्रम तर मोडत आहे, पण सोशल मीडियावरही लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.

बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानने तब्बल ५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुखचा नवा चित्रपट 'पठाण' दररोज कमाईचे विक्रम तर मोडत आहे, पण सोशल मीडियावरही लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. शाहरुखचा हा चित्रपट लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. Amazon Prime Video ने चित्रपटाचे OTT अधिकार विकत घेतले आहेत.

'पठाण' रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान 2018 च्या अखेरीस आलेल्या 'झिरो'मध्ये दिसला होता. त्यानंतर त्यांचा एकही चित्रपट आलेला नाही. मधल्या काळात अनेक चित्रपटांमध्ये तो कॅमिओ भूमिका करताना दिसला.

Amazon Prime Video ने पठाणचे OTT अधिकार जवळपास 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. Amazon प्राइम व्हिडिओ कोणत्या तारखेला आपल्या प्लॅटफॉर्मवर रिलीज करेल याबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. या चित्रपटाची डिजिटल रिलीज 3 महिन्यांत होईल. म्हणजेच एप्रिलमध्ये लोकांना हा चित्रपट घरबसल्या टीव्ही आणि मोबाईलवर आरामात पाहता येईल.

'पठाण' चित्रपटाचे तिकीट आता खूप महाग झाले आहे.आपल्याला आता  Amazon Prime Video वर मोफत पाहता येऊ शकतो. याची सदस्यता योजना 179 रुपये प्रति महिना पासून सुरू होते. 

Kabir Bedi : चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर सलमान खानने यात छोटी भूमिका केली आहे. यशराज प्रॉडक्शनच्या 'स्पाय युनिव्हर्स' अंतर्गत बनलेला हा चौथा चित्रपट आहे. रिलीजच्या 3 दिवसांतच या चित्रपटाच्या एकूण कलेक्शनने 300 कोटींचा आकडा पार केला आहे.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनशाहरुख खानपठाण सिनेमा